वीजबिल भरावेच लागणार; …तर थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित, ऊर्जामंत्र्यांचा इशारा

| Updated on: Feb 28, 2022 | 9:16 AM

जे ग्राहक वीज देयकाची रक्कम भरणार नाहीत अशा वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे. वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करताना कोणतीही गय केली जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वीजबिल भरावेच लागणार; ...तर थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित, ऊर्जामंत्र्यांचा इशारा
नितीन राऊत, ऊर्जा मंत्री
Follow us on

अकोला : जे ग्राहक वीज देयकाची (Electricity Bill) रक्कम भरणार नाहीत अशा वीज (Electricity ) ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिला आहे. वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करताना कोणतीही गय केली जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. राज्यभरात शेतकऱ्यांचे वीजपुरवठा खंडित करण्यावरून तीव्र आंदोलन सुरू असताना ऊर्जामंत्र्यांचे हे वक्तव्य आंदोलकांना देण्यात आलेला स्पष्ट इशारा मानले जात आहे. यामुळे आंदोलक व राज्य सरकार यांच्यातील संघर्ष विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वाढण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांचे वीजबिल थकले आहे, अशा शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरण विभागाकडून सुरू असल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

काय म्हणाले ऊर्जामंत्री

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते महावितरणकडून उच्च दाब वितरण प्रणाली योजनेत उभारण्यात आलेल्या अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू, बार्शी टाकळी तालुक्यातील कोथळी आणि घोटा येथील वीज उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. राऊत म्हणाले की, कोरोना काळात सर्वत्र ताळेबंदी असताना महावितरणकडून राज्यातील जनतेला अखंडित वीजपुरवठा करण्यात आला.  कोरोनामुळे काही जणांच्या रोजगारावर संकट आले याची आम्हाला कल्पना आहे. पण जर वीज वापरली असेल तर येणाऱ्या देयकाचे पैसे भरवेच लागतील. वीज ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महावितरण आणि शेतकऱ्यांमधील संर्घष वाढणार?

महावितरणकडून वीजबिल थकबाकीदार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा कट करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. ऐन पिकाला पाणी देण्याच्या काळात वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. वीजपुरवठाच नसल्याने पिकाला पाणी कसे द्यायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिलाय. त्यामुळे आता शेतकऱ्यांकडून प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. भविष्यात महावितरण आणि शेतकऱ्यांमधला हा संर्घष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

सीटबेल्ट लावला, गाडी काढली आणि दाणकन खांबावर आपटली, उदयनराजेंना डोक्याला हात मारायला लावणारा किस्सा काय?

Nashik Election | भाजपमधील नाराजी, राऊतांचा बाण अन् राष्ट्रवादीचे आव्हान महाजन रोखणार का?

तिवसा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणूक; शिवसेनेचा विजय, यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का