पुणे – पुण्यात अखेर ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. पुणे शहरात 1 , पिंपरी चिंचवड शहरात 6 तर आळंदीमध्ये 1 अश्या सात नागरिकांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे. पुणे, पिंपरी- चिंचवडसह आळंदीमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
परदेशातून परतलेल्या 267 नागरिकांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह!
पुणे शहरात 438 नागरिक परदेशातून नुकतेच परतले असून त्यापैकी 370 नागरिक मनपा हद्दीतील आहेत. 370 पैकी 335 नागरिकांपर्यंत पोहोचण्यात महापालिकेला यश आले आहे. आतापर्यंत 267 नागरिकांची RT-PCR करण्यात आली असून सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत
जिल्हा प्रशासनाने बनवली यादी
ओमीक्रॉनच्या धास्तीमुळं प्रशासन सर्तक झाले होते . प्रशासनाने आतापर्यंत परदेशातून पुणे व जिल्ह्यात आलेल्या प्रवाश्यांची यादी तयार करण्यात आली आहे.
पुणे -438
पिंपरी -चिंचवडमध्ये – 131,
ग्रामीण भागात – 67,
खडकी कटक मंडळात -6
पुणे कटक मंडळात- 1
ग्रामीण भागात परदेशातून आलेलया नागरिकांची संख्या
हवेली तालुक्यात सर्वाधित – 29
मुळशीत- 11 ,
बारामतीत – 3,
इंदापूर -3 ,
जुन्नर -3
जिल्हा प्रशासनाने परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती मिळवली आहे तेथील स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना या व्यक्तींचा शोध घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत .त्यांना शोधून त्यांच्या पत्त्याची तपासणी करून चाचणी करण्यात येणार आहे. येत्या दोन- तीन दिवसात ही कार्यवाही पूर्ण करणार असल्याची माहितीही जिल्हा आरोग्य प्रमुख डॉ . भगवान पवार दिली आहे .
त्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने मिळाला होता दिलासा
झांबिया देशातून 20 दिवसांपूर्वी पुण्यात आलेला व कोविड पॉझिटिव्ह असलेल्या 60 वर्षीय व्यक्तीचा ओमायक्रॉन अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे काही काळ पुणेकरांना दिलासा मिळाला होता. या रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना 30 नोव्हेंबरला त्याची जिनोम सिक्वेन्सिंग’ म्हणजे जनुकीय क्रमनिर्धारण चाचणी करण्यात आली होती.त्याचा स्वॅब राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आला होता. या चाचणीमध्ये ओमायक्रॉन निगेटिव्ह असल्याचे आढळून आले, मात्र व्यक्तीला डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली असल्याचे समोर आले आहे
महापालिका अर्लट मोडवर
ओमिक्रॉनचा धोका लक्ष्यात घेऊन पुणे महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. विमानतळावर आलेल्या प्रत्येक प्रवाश्याची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. त्याचबरोबर आवश्यकता भासल्यास जम्बो कोविड सेंटर सुरु करण्याच्या तयारी सोबतच लसीकरणाचा वेगही वाढविण्यात आल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेत पुण्यात कोरोनाचे नवीन निर्बंध घालण्यात आले आहेत.
या नियमांचे करावं लागेल पालन
Omicron : राज्यात आणखी 7 जणांना ओमिक्रॉन, पिंपरी-चिंचवडमध्ये 6, पुण्यात 1 ओमिक्रॉनबाधित