Fact Check : महाराष्ट्रात युरेनियमचा वापर कशासाठी ? मुंबईत पकडलेले दोन्ही आरोपी मुस्लीम ? वाचा सत्य काय

| Updated on: May 08, 2021 | 10:24 AM

युरेनियम तस्करीमध्ये पकडण्यात आलेले दोन्ही आरोपी हे मुस्लीम असल्याचा दावा केला जातोय. याची सत्यता पडताळून दाव्यात तथ्य नसल्याचं वृत्त 'अल्ट न्यूज'ने दिले आहे. (men arrested possession of uranium)

Fact Check : महाराष्ट्रात युरेनियमचा वापर कशासाठी ? मुंबईत पकडलेले दोन्ही आरोपी मुस्लीम ? वाचा सत्य काय
VIRAL TWEET
Follow us on

मुंबई : मुंबई शहरात गुरुवारी (6 मे) एक खळबळजनक घटाना घडली. या दिवशी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून (ATS) तब्बल 7 किलो युरेनियम पकडण्यात आले. बाजारमुल्यानुसार या युरेनियमची किंमत तब्बल 21 कोटी रुपये आहे. युरेनियमचा हा धातू संवेदशनील आणि रेडिओअ‌ॅक्टिव्ह असल्यामुळे तो अत्यंत घातक असल्याचे म्हटले जाते. दरम्यान, तब्बल 21 कोटींचे युरेनियम मुंबईत नेमके कशामुळे आणण्यात आले, हा प्रश्न सर्वांना पडतोय. मात्र, याच पार्श्वभूमीवर आता या युरेनियम तस्करीमध्ये पकडण्यात आलेले दोन्ही आरोपी हे मुस्लीम समाजाचे असल्याचा दावा केला जातोय.   ‘अल्ट न्यूज’ने  या दाव्याची सत्यता पडताळणी केली आहे.  त्यामध्ये प्रशांत पटेल उमराव या ट्विटरवरील वापरकर्त्यानं केलेला दावा चुकीचा असल्याचं स्पष्ट झालंय.  या प्रकरणी पकडण्यात आलेला एक आरोपी मुस्लीम आणि एक आरोपी हिंदू आहे.  (fact check of community of men arrested by maharashtra act for uranium possession)

दोन्ही आरोपी मुस्लीम असल्याचा दावा

अल्ट न्यूजने दिलेल्या माहितीनुसार युरेनियम तस्करीमध्ये एकूण दोन आरोपी पकडण्यात आले आहेत. मात्र, तस्करीचा हा प्रकार समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चांना तोंड फुटले. काहींनी या प्रकरणात एकूण तीन आरोपी पकडण्यात आल्याचा दावा केला. तर काहींना या प्रकरणात एकूण 2 आरोप पकडण्यात आले असून ते दोन्ही मुस्लीम असल्याचं ठणकाऊन सांगितलं. काहींनी तर दोन्ही आरोपींची मुस्लीम नावं जाहीरसुद्धा केली.

सोशल मीडियावरसुद्धा अनेक पोस्ट

उदाहरण सांगयचं झालं तर, प्रशांत पटेल उमराव या व्यक्तीने कोणतेतरी मोठे षडयंत्र रचले जात होते असा दावा करुन यामध्ये पकडण्यात आलाल्या आरोपींची नावे ही अबू ताहीर अफजल हुसैन, आणि मोहम्मद जिगर असल्याचे सांगितले. तसेच एका ट्विटर युजरने आरोपींना पकडल्यानंतर या घटनेला युरेनियम जिहाद असे नाव देत काँग्रेसी विचारधारा असणारे तसेच उदारमतवाद्यांवर सडकून टीका केली

खरंच पकडण्यात आलेले दोन्ही आरोपी मुस्लीम आहेत ?

सोशल मीडियावर या युरेनियम तस्करीमध्ये पकडण्यात आलेल्या आरोपींबद्दल वेगवेगळ्या चर्चा होत असताना ‘अल्ट न्यूजने’ याबद्दल एक रिपोर्ट दिला आहे. अल्ट न्यूजने सांगितल्याप्रमाणे या प्रकरणात तीन नाही तर एकूण दोन आरोप पकडण्यात आले आहेत. यामध्ये एक हिंदू तर एक मुस्लीम समाजाचा आरोपी आहे. त्या आरोपींची नावे अबू ताहिर आणि जिगर पांड्या अशी आहेत. ही माहिती अल्ट न्यूजने दिली आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नये

दरम्यान ही माहिती समोर आल्यानंतर मुंबईतील 7 किलो युरेनियम तस्करी प्रकरणात फक्त मुस्लीम समाजाचे आरोपी नसून यामध्ये एक हिंदू तर एक मुस्लीम समाजाचा आरोपी आहे, असे स्पष्ट होत आहे. तसेच काही शक्तींकडून सामाजिक स्वास्थ बिघडवण्याचासुद्धा प्रयत्न होत असल्याचे उघड झाले आहे. अशा वेळी, कोणत्याही ऐकीव आणि फॉरवर्डेड माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

इतर बातम्या :

Video | रश्मी देसाईचा छोट्या स्कर्टमध्ये हॉट डान्स, व्हिडीओ पाहून चाहते नाराज

MBA मित्रांकडे 21 कोटी 30 लाखांचे घातक युरेनियम, ATS कडून दोघांना अटक, शिवदीप लांडेंची धडाकेबाज कारवाई

Video | महागडी दारु, खमंग चकणा, महिलांच्या ‘ओल्या पार्टीची’ थेट आयपीएस अधिकाऱ्याकडून दखल, व्हिडीओ व्हायरल

(fact check of community of men arrested by maharashtra act for uranium possession)