नाशिकः ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आता कोरोनाकाळातील लढ्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत. त्याची चुणूक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवीस (Devendra Fadnavis) यांच्या नाशिक (Nashik) येथील सभेत दिसली. त्यांनी राज्य सरकारला चोहोबाजूने घेरले. कोविडच्या काळात नाशिकवर अन्याय झाला. मात्र, महापालिकेने ही जवाबदारी स्वीकारली अन् पुढचे सारे निभावले असा दावा त्यांनी केला. फडणवीस यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ आहेत. येणाऱ्या काळात यावरून भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) हा सामना महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नक्कीच रंगणार आहे. कारण नाशिकमध्ये कोविडच्या दोन्ही लाटा गंभीर होत्या. त्यामुळे नागरिकांना अक्षरशः तडफडावे लागले.
कोविडप्रकरण गंभीर का?
नाशिकमध्ये कोरोनाचे आजपर्यंत आत्तापर्यंत 8 हजार 887 रुग्णांचा मृत्यू झाले आहेत. विशेष म्हणजे तिसरी लाट ओसरल्याची घोषणा एकीकडे करण्याची घाई झालेली असताना, दुसरीकडे नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात चक्क कोरोनामुळे 33 रुग्णांचा मृत्यू झाला. अगदी आजपर्यंत हे मृत्यू सत्र सुरू आहे. त्यात भर म्हणजे नाशिकमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन आणि औषधींचा प्रचंड तुटवडा जाणवल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. नागरिकांनी चक्क रस्त्यारस्त्यावर ऑक्सिजन आणि इंजक्शनसाठी रांगा लागल्या. त्यावरूनच आता फडणवीसांनी राज्य सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
काय म्हणाले फडणवीस?
नाशिक दौऱ्यावर आलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी नाशिककरांसाठी भळभळती जखम असणाऱ्या कोरोना आठवणीची खपली काढली. ते म्हणाले की, कोविडच्या काळात नाशिकवर अन्याय झाला. मात्र, महापालिकेने ही जबाबदारी स्वीकारली. राज्याने एक नव्या पैशाची मदत केली नाही. शेवटी मी आलो आणि त्यानंतर ऑक्सिजन मिळालं. हे जर जाऊन बसले नसते, तर नाशिकला ऑक्सिजन मिळालं नसतं. महाराष्ट्रात कोण राज्यकर्ते आहेत हेच समजत नाही. सरकारचं अस्तित्व नाही. राज्य मुंबईच्या बाहेर देखील असतं, हे यांना माहीत नाही, अशी टोलेबाजी त्यांनी केली. आता येणाऱ्या काळात राज्य सरकार याला काय उत्तर देणार हे पाहावे लागेल.
पालिकेत हस्तक्षेप केला नाही
फडणवीस यांनी गेल्या महाालिका निवडणुकीत नाशिक दत्तक घेतल्याची घोषणा केली होती. त्याचा उल्लेख करून फडणवीस म्हणाले की, शहर दत्तक घेतले म्हणजे रोज महापालिकेत हस्तक्षेप करून दलाली खायची असं नाही. शहरात एवढी कामे झाली आहेत, त्याच कारण आम्हाला राज्य दलाली खाण्यासाठी नाही, तर लोकांची काम करण्यासाठी हवं असतं, असा टोला त्यांनी विरोधकांचा नाव न घेता हाणला.
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!