नाशिकः कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत रब्बी हंगामासाठी हरभरा, रब्बी ज्वारी, गहू आणि मका बियाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिली.
अनुदानित बियाण्याचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेले शेतकरी तसेच लक्षांकपूर्तीसाठी ऑफलाइन पद्धतीने शेतकरी निवडून तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कार्यवाही सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात हरभरा 8016 क्विंटल, गहू 3290 क्विंटल, ज्वारी 70 क्विंटल व मका 433 क्विंटल इतक्या अनुदानित बियाण्यांचे तालुकानिहाय वितरणासाठी नियोजन करण्यात आले आहे. 10 वर्षे आतील प्रमाणित हरभरा बियाणे (फुले विक्रम, RVG -202) साठी प्रति किलो रुपये 25 अनुदान, रब्बी मका पिकासाठी रुपये 95 प्रति किलो किंवा किमतीच्या 50 टक्के अनुदान, रब्बी ज्वारी रुपये 30 प्रति किलो अनुदान तसेच ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत हरभरा (फुले विक्रम, RVG-202, जॅकी-9218) साठी प्रति किलो रुपये 25 अनुदान, गहू (फुले समाधान, लोकवन व एच.डी.2189) पिकासाठी प्रति किलो रुपये 16 अनुदान या प्रमाणे शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे महाबीज व राष्ट्रीय बीज निगम यंत्रणेकडील वितरकांमार्फत तालुकास्तरावर परमिटद्वारे वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 1 एकर क्षेत्रासाठी अनुदानित बियाण्याचा लाभ घेता येणार आहे. शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी आधार कार्ड व 7/12 उताऱ्याच्या झेरॉक्स प्रतीसह तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून परमिट मिळवून अनुदानित बियाण्यांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.
बियाणांच्या किमती वाढल्या
एकीकडे खरिपात अतिवृष्टीने झोडपून काढले. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. दुसरीकडे आता रब्बी पेरण्याच्या तोंडावर बियाणांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकरी कचाट्यात सापडला आहे. कांदा रोपाची टंचाईही जाणवते आहे. कांदा रोपालाही बियाणांचा पर्याय आहे. मात्र, त्यांच्याही किमती साधरणतः दहा हजार रुपयांना पायली आहेत. त्यामुळे सरकारने कांदा बियाणे किंवा रोपावरही अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत. नाशिक जिल्ह्यात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. असा निर्णय झाल्यास त्याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होणार आहे. (Farmers in Nashik district will get seeds on subsidy for rabi sowing)
इतर बातम्याः
कांदा करणार वांदा, आयातीला शेतकरी संघटनेचा विरोध; व्यापारी-आडत्यांना धडा शिकवण्याचा इशारा
Special Report: स्वातंत्र्याचं बेफाम वारं, अनंतराव नावाचा झंझावात अन् महाराष्ट्रातलं ‘मॅन्चेस्टर गार्डियन’https://t.co/mThHQYOyX6#Marathwada|#HyderabadMuktisangram|#FreedomFighterAnantraoBhalerao|#Aurangabad|#Maharashtra|#Razakar
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 8, 2021