नाशिकः कंगना राणावत यांनी ‘१९४७ चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले.’ असे निंदनीय वक्तव्य करून संपूर्ण देशासह स्वातंत्र सैनिकांचा अपमान केला. त्यामुळे त्यांच्याविरोधात कलम १५३ (अ) कायद्या अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शनिवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांची भेट घेऊन केली. यावेळी त्यांना सर्व पुरावे देण्यात आले.
कंगना राणावतची हिंदी चित्रपट सृष्टीतील नामांकित अभिनेत्री अशी ओळख आहे. त्यांना त्यांच्या चित्रपट सृष्टीतील कामगिरीबद्दल नुकतेच पद्मश्री या बहुमानाने गौरविण्यात आले. या गौरवानंतर त्यांनी एक वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ‘देशाला पूर्वी मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 रोजी मिळाले,’ अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे. राणावत यांच्या या वक्तव्यामुळे देशाचा, देशातील प्रत्येक नागरिकाचा आणि त्याहून महत्वाचे देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हजारो स्वातंत्र्यसेनानींचा अपमान झाला झाले, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली होती. स्वातंत्र्यसेनानींनी देशासाठी दिलेले बलिदान राणावत यांच्या एका वक्तव्यामुळे कवडीमोल ठरले आहे. देशाचा स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न राणावत यांनी या वक्तव्यातून केला आहे. त्यामुळे कंगना राणावत यांच्यावर 153 (अ) तसेच देशद्रोहासाठी अन्य जी योग्य कलमे असतील, त्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे व शिष्टमंडळाने केली. सर्व पुराव्यांच्या आधारावर पुढील दोन दिवसात कंगना राणावत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती या शिष्टमंडळाला पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी दिली आहे, असे खैरे म्हणाले. याप्रसंगी बाळा निगळ, जय कोतवाल, संतोष जगताप, सागर बेदरकर, नीलेश भंदुरे, रामदास मेदगे, डॉ. संदीप चव्हाण, किरण पानकर, संतोष गोवर्धने, संदीप गांगुर्डे, संदीप खैरे, गणेश गरगटे, भालचंद्र भुजबळ, रोहित जाधव, अमर गोसावी, अमनदीप रंधावा, बजरंग गोडसे आदींसह मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्व पुराव्यांच्या आधारावर पुढील दोन दिवसात कंगना राणावत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती या शिष्टमंडळाला पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी दिली आहे,
– अंबादास खैरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
(File treason case against Kangana Ranaut; NCP’s demand to Nashik police)
इतर बातम्याः
खुलेआम दंगलीवर कारवाई नाही, पोलिसांनी दंडुका उगारल्यास त्यांची मते जातील, चंद्रकांत पाटील यांची टीका
Sonam Kapoor | भारतीय पोशाखातही ग्लॅमरचा तडका, सोनम कपूरचा दिलकश अंदाज पाहून चाहतेही घायाळ!#SonamKapoor | #Bollywood | #Entertainment https://t.co/QPw67BsFsS
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 13, 2021