Hingoli | Narayan Rane यांच्या रक्त आणि घामातून शिवसेना उभी - शिवाजी माने

Hingoli | Narayan Rane यांच्या रक्त आणि घामातून शिवसेना उभी – शिवाजी माने

| Updated on: Feb 21, 2022 | 4:12 PM

शिवसेनेचे (Shivsena) माजी खासदार अॅड. शिवाजी माने यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिलाय. त्यांनी सोशल मीडियावर (Social media) पोस्ट टाकून भाजपा (BJP) आणि शिवसेना वादावर भाष्य केले आहे.

शिवसेनेचे (Shivsena) माजी खासदार अॅड. शिवाजी माने यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिलाय. त्यांनी सोशल मीडियावर (Social media) पोस्ट टाकून भाजपा (BJP) आणि शिवसेना वादावर भाष्य केले आहे. माजी खासदार माने यांच्या मते शिवसेना भाजपाबरोबर किंवा नारायण राणे यांच्याविरुद्ध ज्या पद्धतीने वागतेय, ते योग्य नसल्याचे त्यांचे मत त्यांनी यातून व्यक्त केले आहे. राणे यांच्या घामामधून शिवसेना पुढे आली आहे, हे विसरता कामा नये. त्यांच्याविरोधात शिवसेनेने आता बोलू नये, त्यांनी काय केले आणि किती खून पाडले यावर बोलू नये. तसेच राणेंनीही मातोश्रीविरोधात बोलण्याचे काही कारण नाही, असे शिवाजी माने या व्हिडिओतून व्यक्त होत आहेत. ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीविरुद्ध आमच्यासारखा फाटका शिवसैनिक आयुष्यभर लढला त्याच शिवसैनिकांचे स्वप्न पूर्ण होत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांचा हा व्हिडिओ हिंगोली जिल्ह्यात व्हायरल झालाय.