Sameer wankhede | ‘हिसाब तो देना ही पडेगा….’ माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी

| Updated on: Aug 19, 2022 | 12:13 PM

समीर वानखेडे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना ही धमकी देण्यात आली आहे.

Sameer wankhede | हिसाब तो देना ही पडेगा.... माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer wankhede) यांना जीवे मारण्याची धमकी (Threat) देण्यात आल्याचे वृत्त आहे. सोशल मीडियावरून त्यांना धमकीचे संदेश आलाय. 14 ऑगस्ट रोजी अमन नावाच्या ट्विटर हँडलवरून वानखेडे यांना एक संदेश आला. त्यात त्याने लिहिले होते, ‘तुमको पता है तुमने क्या किया है.. इसका तुम्हे भुगतान करना होगा…. तुमको खत्म कर देंगे…’ हा संदेश आल्यानंतर समीर वानखेडे यांनी गोरेगाव पोलिस (Goregaon Police) स्टेशनशी संपर्क साधला. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. गुरुवारी वानखेडे यांचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला. दरम्यान, समीर वानखेडे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना ही धमकी देण्यात आली आहे.

नार्कोटिक कंट्रोल ब्युरोचे चीफ…

मागील वर्षी समीर वानखेडे हे मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख होते. नवाब मलिक यांचे जावाई समीर खान यांना समीर वानखेडे यांच्या टीमने अटक केली होती. समीर यांच्या सुटकेनंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंना टार्गेट करण्यास सुरु केले होते. 2021 च्या क्रूज ड्रग प्रकरणात शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खानचेही नाव होते. या संपूर्ण प्रकरणात समीर वानखेडेंविरोधात नवाब मलिक यांनी जातीवरून तसेच इतर अनेक आरोप केले. त्यानंतर वानखेडे यांना एसीबीवरून हटवण्यात आले.

नवाब मलिक यांनाही धमकी

नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील वाद जगजाहीर आहेत. कित्येक दिवस या दोहोंतील वाक् युद्ध सुरु होतं. मागील वर्षी नवाब मलिक यांनीदेखील मला धमक्या दिल्या जात असल्याचा दावा केला होता. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना टार्गेट करू नका, अन्यथा जीवे मारू, अशी धमकी दिल्याची तक्रार नवाब मलिकांनी केली होती. त्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. नवाब मलिक सध्या ईडीच्या कोठडीत आहेत.

समीर वानखेडेंना जात प्रमाणपत्रात क्लिन चीट

दरम्यान, समीर वानखेडे यांच्या जातीवरून नवाब मलिक यांच्यावर आरोप केले होते. जात पडताळणी समितीच्या अहवालात नुकतीच समीर वानखेडे यांना क्लिनचिट देण्यात आली. समितीने दिलेल्या रिपोर्टनुसार, समीर वानखेडे जन्मतः मुस्लिम नाहीत. समीर वानखेडे आणि त्यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी मुस्लिम धर्म स्विकारला आहे, हे सिद्ध होत नाही. जात पडताळणी प्रमाणपत्रानुसार, समीर वानखेडे हे महार 37 अनुसूचित जातीचे असल्याचे सिद्ध झाले आहे.