सत्यजित तांबे यांचा ट्विट करून कुणाला इशारा, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी…तांबेच्या ट्विटचा अर्थ काय?

| Updated on: Feb 14, 2023 | 5:58 PM

उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी...घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी अशा ओळींचे ट्विट सत्यजित तांबे यांनी केले आहे.

सत्यजित तांबे यांचा ट्विट करून कुणाला इशारा, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी…तांबेच्या ट्विटचा अर्थ काय?
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी….. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी अशा आशयाचे ट्विट आमदार सत्यजित तांबे ( Satyajit Tambe ) यांनी केलं आहे. त्यामध्ये सत्यजित तांबे यांनी थेट कॉंग्रेस ( Congress ) पक्षावर निशाणा साधल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात ( Political News ) सुरू झाली आहे. नाशिक पदवीधर नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांचे कौतुक करत घरवापसी करण्यावर बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलं होतं. त्यानंतर सत्यजित तांबे यांनी आज केलेले ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक राज्यात चर्चेत राहिली आहे. यामध्ये सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी केल्याने थोरात आणि तांबे कुटुंब चर्चेचा विषय ठरले होते. याशिवाय कॉंग्रेसकडून यावेळी जोरदार टीका करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर आमदार सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांनी एका कार्यक्रमात सत्यजित तांबे यांना पुन्हा कॉंग्रेसमध्ये येणाच्या संदर्भात सुचन विधान करत एकप्रकारे कॉंग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते.

त्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलेल्या नाराजीची दखल घेण्यात आल्याचेही स्वतः बाळासाहेब थोरात यांनी सांगितले होते. याशिवाय माझ्या हाताचा प्रॉब्लेम झाला नसता तर कॉंग्रेसकडून जी तांत्रिक अडचण झाली असती ती झाली नसती.

याशिवाय सत्यजित तांबे यांची संपूर्ण टीम कॉंग्रेसमध्ये आहे आणि तो एकटा पडला आहे. त्यामुळे कुणालाही करमनार नाही. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये सत्यजित ने परत यावे असं म्हंटलं होतं.

बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या विधानानंतर सत्यजित तांबे यांची कॉंग्रेसमध्ये घरवापसी होईल अशी चर्चा सुरू असतांनाच सत्यजित तांबे यांनी खळबळ उडवून देणारे ट्विट केले आहे. त्यामध्ये कॉंग्रेसमध्ये जाणार नाही असा स्पष्ट संदेशच देण्याचा प्रयत्न सत्यजित तांबे यांनी केला आहे.

उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी…घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी अशा ओळींचे ट्विटवरुन सत्यजित तांबे हे कॉंग्रेसला इशारा देत असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

त्यामुळे येत्या काळात आमदार सत्यजित तांबे यांची राजकीय भूमिका काय असणार अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यामध्ये सत्यजित तांबे यांनी यापूर्वी मी अपक्षच राहणार असल्याचे म्हंटले होते त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासाची चर्चेला पूर्णविराम लागला होता.