बेळगाव : कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील चार भावांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. हा प्रकार बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील हल्ल्याळ गावात घडला असून या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. कृष्णा नदीच्या घाटावर ही घटना घडली. गोपाला बनसोडे, सदाशिव बनसोडे, शंकर बनसोडे, दऱ्याप्पा बनसोडे अशी बुडालेल्या भावांची नावे आहेत. (Four brothers drown in water of Krishna river in Belgaum)
मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील हल्ल्याळ गावात गोपाला बनसोडे, सदाशिव बनसोडे, शंकर बनसोडे, दऱ्याप्पा बनसोडे हे एकाच कुटुंबातील चार भाऊ कृष्णा नदीत कपडे धुण्यासाठी गेले होते. मात्रस यावेळी अचानकपणे हे चारही जण नदीवरच्या घाटावजवळ बुडाले. चारही भाऊ गायब असल्याचे समजताच नदीघाटावर एकच खळबळ उडाली. नंतर या चारही भावांना नदीमध्ये जलसमाधी मिळाल्याचे समजले.
हा प्रकार बुडालेल्या चार भावांच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. घटनेनंतर नातेवाईकांचा आक्रोश सुरु आहे. स्थानिक नागरिक तसेच मच्छीमार यांच्या मदतीने बुडालेल्या चारही भावांचा शोध घेणे सुरु आहे.
पाहा व्हिडीओ :
दरम्यान, ठाण्यामध्ये एकाच दिवशी तीन जणांचा तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार 20 जून रोजी घडला होता. पहिली घटना ही सकाळच्या सुमारास निल तलावात घडली होती. एका 16 वर्षीय युवकाला चक्कर आली आणि तो या तलावात पडला होता. त्याच्यासोबत आणखी एक तरुण त्याच तलावात पडला. त्याचा मृतदेह संध्याकाळी उशिरा अग्निशमन दलाच्या जवानांनी तलावातून बाहेर काढला होता. तर तिसरी घटना ही लोकमान्य परिसरात घडली होती. एक 33 वर्षीय तरुण हा पोहोयला गेला असता त्याचा चिखलात पाय रुतला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला होता.
इतर बातम्या :
Nanded | नांदेडच्या कंधारमध्ये विकासकामांच्या शुभारंभावेळी शेकाप आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा
घरकुलात लपवला 15 किलो गांजा, वाशिम पोलिसांकडून महिलेला बेड्या
Video : आमदार अंबादास दानवेंनी फोडली वाहतूक कोंडी, बेशिस्त रिक्षाचालकालाही दिला चोप!
(Four brothers drown in water of Krishna river in Belgaum)