पुणे : गणेशोत्सव काळात पुण्यात जमावबंदी किंवा संचारबंदी लागू करण्यात आली नव्हती. मात्र, अनंत चतुर्दशीला (Anant Chaturdashi) म्हणजे गणपती विसर्जनादिवशी (Ganesh Visarjan) पुण्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. अनंत चतुर्दशीला पुण्यात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा अजित पवार आणि पुणे प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. (Shops will be closed on Anant Chaturdashi in Pune, Only essential services will continue)
राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यात गणपती विसर्जना दिवशी निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गणेश विसर्जनाला पुणेकर मोठ्या संख्येनं घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात सर्व दुकाने बंद करुन निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आज पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात किल्ले सिंहगड परिसर विकासाबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी किल्ले सिंहगड परिसराच्या पुरातन वारशाला शोभेल आणि पर्यावरणाला अनुरूप असा विकास करावा, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले अशी माहिती अजित पवार यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. परिसरातील वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक वाहनांचा उपयोग करावा. वाहनतळावर वाहनचालकांसाठी देखील सुविधा असावी. पर्यटकांसाठी स्वच्छता गृहाची सुविधा करण्यात यावी. पर्यटकांना इतिहासाविषयी माहिती मिळावी आणि पर्यटनाचा आनंदही घेता यावा, हा दृष्टिकोन समोर ठेऊन विकास करावा, अशा सूचना केल्याचंही त्यांनी सांगितलं.
पर्यटकांना माहिती देण्यासाठी मराठी आणि हिंदी भाषा जाणणाऱ्या स्थानिकांना गाईड म्हणून प्रशिक्षण देण्यात यावं. पर्यटकांना पिठलं-भाकरीसारखे स्थानिक पदार्थ उपलब्ध करून द्यावेत. किल्ल्याच्या सौंदर्याला कोणतीही बाधा येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही पवार यांनी यावेळी दिले.
मुळशी तालुक्यातील हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करा, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील सुविधांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, औद्योगिक वसाहत परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सूस आणि वाकड रस्त्यांचे अपूर्ण काम त्वरित पूर्ण करावे. म्हाळुंगे मार्गे हिंजवडी रस्त्याच्या कामाचेही नियोजन करावे. एमआयडीसीने कचरा प्रकल्पासाठी त्वरित कार्यवाही करावी. माण, मारुंजी येथे पोलीस चौकीस मान्यता देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
इतर बातम्या :
धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ वक्तव्याकडे निव्वळ विनोद म्हणून पाहते, खासदार प्रीतम मुंडेंचा टोला
‘लहानपणी क्रिकेट खेळायचो तेव्हा गावस्कर माझा देव होता’; रोखठोक ट्वीटनंतर आव्हाडांकडून भूमिका स्पष्ट
Shops will be closed on Anant Chaturdashi in Pune, Only essential services will continue