हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. जळगाव जिल्ह्यातील दोन्ही नेत्यांचे वर्चस्ववादाचे भांडण सभागृहात दिसून आले. त्यावर गिरीश महाजन यांनी सोमवारी स्पष्टीकरण दिले आहे. गिरीश महाजन म्हणाले, एकनाथ खडसे आणि माझे प्रेम आधीपासून आहे. एकनाथ खडसे माझ्याविषयी कमरेखालचे बोलत असतात. त्यामुळे मलाही त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर द्यावे लागते. खडसे ज्या पद्धतीने बोलता त्यांच्याविषयी मला राग येणे स्वभाविक आहे.
एकनाथ खडसे आणि तुमच्यात -दोघांमध्ये दरी दूर होईल केंद्रीय मंत्री रक्षा खडसे म्हणतात. त्यावर गिरीश महाजन म्हणाले, रक्षा खडसे यांनी आधी आधी एकनाथ खडसे यांना घरी समजावावे, अशा कानपिचक्या दिल्या.
गिरीश महाजन यांना पुन्हा एकदा जलसंपदा खात्याची जबाबदारी मिळाली आहे. त्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले. जलसंददा विभागाची जबाबदारी माझ्यावर आली त्याचा मला खूप आनंद आहे. 2014 ते 2019 दरम्यान मी हे खाते सांभाळले होते. या खात्याची जबाबदारी घेताना अनेक कामे मी केली. आता आणखी चांगले काम मला या खात्याच्या माध्यमातून करायचा आहे. यावेळी आमच्याकडे मंत्र्यांची संख्या जास्त होती. त्यामुळे एका खात्याची दोन खाते करावी लागली.
ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीवर गिरीश महाजन म्हणाले, छगन भुजबळ साहेब हे ओबीसीचे मोठे नेते आहेत. त्यांना मंत्रिमंडळात घ्यायला पाहिजे होते. परंतु अजितदादा व राष्ट्रवादीचा तो अंतर्गत विषय आहे. त्यामुळे आपण त्या विषयावर भाष्य करु शकत नाही.
कल्याणध्ये परप्रांतीय लोकांनी केलेले हल्ले ही अतिशय दुर्दैवी बाब आहे, या विषयी कोणाचीही मुजोरी खपवून घेतल्या जाणार नाही, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. मनसे नेते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका कार्यक्रमात एकत्र आले. त्यावर गिरीश महाजन म्हणाले, कुटुंबिक लग्नाच्या कार्यक्रमात ते एकत्र येत असतात. यापूर्वी अशा कार्यक्रमांना ते एकत्र आले आहेत.