कोल्हापूर : दुधाच्या (Milk Price) दरात वाढ झाली की (Animal Feed) पशूखाद्याच्या दरात वाढ ही ठरलेलीच आहे. 15 दिवसांपूर्वीच गायीच्या दूध दरात 2 रुपयांनाी वाढ झाली होती. त्यापाठोपाठ आता पशूखाद्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दर वाढीचे कारणे पुढे करीत (Gokul Milk) गोकूळ दूध संघाकडून पशूखाद्य दरवाढीचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे उत्पादन आणि त्यावरील खर्च याची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत ही सुरुच आहे.गेल्या दोन महिन्यात पशूखाद्य तयार करण्यासाठी आवश्यत असलेल्या कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये 15 ते 35 टक्क्यांपर्यंतची वाढ झाली असल्याचा दावा संघाच्यावतीने करण्यात आला आहे. त्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे गोकूळ दूध संघाच्या प्रशासनच्यावतीने सांगण्यात आले आहे.
गोकूळ दूध संघाचे पशूखाद्य करण्याचे 2 कारखाने आहेत. गेल्या वर्षभरापासून पशूखाद्याच्या कच्च्या मालाच्या दरात वाढ ही ठरलेलीच आहे. कच्च्या मालाबोरबरच इंधनाच्या दरातही वाढा झाली आहे. त्यामुळे पशूखाद्य उत्पादनात मोठा तोटा गोकूळ सहन करावा लागला आहे. आतापर्यंत संघाने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला होता पण अधिकचे होत असलेले नुकसान पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले आहे.
गेल्या तीन महिन्यापासून दूध दरात वाढा होत आहे. त्यामुळे दूध उत्पादकांमधून समाधान व्यक्त होत असतानाच गोकूळ संघाने घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा ठरणार आहे. दर तीन महिन्यातून एकदा पशूखाद्याचे दर वाढतात तर दुधाचे वर्षातून एकदा. यंदा दुधाच्या दरात झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी समाधानकारक असताना गोकूळ संघाने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला झळ पोहचणार हे नक्की. महागाईमध्ये अणखीन एकाची भऱ पडलीह आहेच.
भर उन्हाळ्यात हिरावा चारा तर दुरापस्त झाला आहेच पण नव्याने निघालेला कडबा हा किती दिवस पुरेल हा देखील मोठा प्रश्न आहे. त्यामुळे दुभत्या जनावरांना पशूखाद्य म्हणून कांडी, सरकी, पेंड यासारख्या पशूखाद्याचा वापर वाढत आहे. यामुळे उत्पादन वाढत असले तरी घटत्या दराचे काय असा सवाल आहे. पशूपालनाचा सर्वाधिक आधार शेती या मुख्य व्यवसायाला आहे. असले तरी दूध दरात होणारी वाढ आणि पशूखाद्याच्या वाढत्या किंमती यामध्ये मोठी तफावत असल्याने ही भरपाई काढता येत नाही.