शाहिद पठाण टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, गोंदिया | 27 ऑक्टोबर 2023 : एकीकडे शासनाच्या शासकीय रुग्णालयात आरोग्याची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयातील कारभारांच्या अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असून बऱ्याच रुग्णालयात रुग्णांना जीव गमवावा लागल्याच्या दुर्दैवी घटनांमुळे अख्ख राज्य नुकतंच ढवळून निघालं होतं. रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश अद्याप थांबलेला नसनाताच आता शासकीय रुग्णालयातील नवा गोंधळ समोर आला आहे. आता गोंदिया जिल्ह्यातील शासकीय महाविद्यालयामध्ये हे देखील आरोग्याच्या समस्यांनी घेरलेलं असल्याचा माहिती समोर आली आहे. त्यातील कारभारामुळे रुग्णांना मोठा फटका बसत आहे. नेमकं काय घडतंय तिथे ?
रुग्णालयात रिपोर्ट्ससाठी सहन करावा लागतोय मनस्ताप
जर तुम्हााा गोंदियाच्या शासकीय रुग्णालयामध्ये एक्स-रे करण्यासाठी किंवा सोनोग्राफी करण्यासाठी जायचं असेल तर आधीच सावध व्हा. कारण तिथे जाताना तुम्हाला अँड्रॉइड मोबाईल किंवा सीडी घेऊनच जावी लागेल. आता रुग्णालयात जाताना सीडी नेण्याच काय कारण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हो ना ? पण हे खरं आहे. तुम्हाला रिपोर्ट्स हवे असतील तर मोबाईल किंवा सीडी सोबत हवीच…
एक्स रे काढा पण रिपोर्ट हवा असेल तर….
गोंदिया जिल्ह्याच्या शासकीय महाविद्यालया मध्ये एक्स-रे करण्याकरिता 90 रुपये घेतले जातात. पण त्याच एक्स-रेच्या रिपोर्ट काही हातात दिला जात नाही. रुग्णांना एक्स-रे च्या फिल्मचा पुरवठा केल जात नाही. तो रिपोर्ट हवा असेल तर रुग्णांना मोबाईलमध्ये दिला जातो. एवढचं नव्हे तर जे रुग्ण सोनोग्राफी करण्यासाठी येतात त्यांनाही रिपोर्
सहज मिळत नाही. त्या रिपोर्टसाठी रुग्णांना स्वखर्चाने सीडी आणावी लागते, त्यानंतरच सोनोग्राफीचा रिपोर्ट त्यामध्ये अपलोड करून दिला जातो. एक्स – रे आणि सोनोग्राफीसाठी रुग्णालयाकडून पैसे घेतले तरी रिपोर्ट्स सहज मिळत नसल्यामुळे नागरिक संतापले आहेत.
याबद्दल शासकीय महाविद्यालयाचे डीन यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी मात्र एमएलसी आणि आवश्यक रुग्णांना फिल्म देण्यात येते. आणि इतर रुग्णांना मोबाईलवर रिपोर्ट देण्यात येताच. तसेच सोनोग्राफीची रिपोर्ट सुद्धा सीडीमध्ये देण्यात येतात असे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णालयाच्या या भोंगळ कारभारामुळे रुग्णांमध्ये आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये रोषाचं वातावरण आहे. आरोग्य विभागाच्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी एकीकडे शासन समोर येत असतानाच शासकीय रुग्णालयात मात्र असुविधाच दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिक सामान्य नागरिकांना चांगल्या सुविधा केंव्हा मिळणार हे मात्र निश्चित सांगता येत नाही, सर्वजण त्याच प्रतीक्षेत आहेत.