गोंदियाच्या शिरपेचात मानाचा तुरा, सामान्य कुटुंबातील मुलाने यूपीएससीमध्ये मिळवली रँक

| Updated on: May 24, 2023 | 5:18 PM

अमितचे शिक्षण हे बारावीपर्यंत गोंदिया येथे झाले आहे. कम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये नागपुरातून पदवी घेतली. त्यानंतर त्याने यूपीएससीची तयारी सुरू केली होती.

गोंदियाच्या शिरपेचात मानाचा तुरा, सामान्य कुटुंबातील मुलाने यूपीएससीमध्ये मिळवली रँक
Follow us on

शाहिद पठाण, प्रतिनिधी, गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा मानाचा तुरा रोवला गेलेला आहे. कारण गोंदिया जिल्ह्याच्या सामान्य कुटुंबातील मुलगा यांनी यूपीएससीमध्ये 581 वे स्थान प्राप्त केले आहे. अमित चंद्रभान उंदीरवाडे गोंदिया येथील एमएसईबी कॉलोनी सूर्याटोला येथील रहिवासी आहेत. सामान्य कुटुंबात जन्माला येऊनही मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर यूपीएससीमध्ये पास झाला. अमितने यूपीएससीत 581 वे स्थान प्राप्त केले आहे.

अमितचे शिक्षण हे बारावीपर्यंत गोंदिया येथे झाले आहे. कम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये नागपुरातून पदवी घेतली. त्यानंतर त्याने यूपीएससीची तयारी सुरू केली होती. तयारी करताना भरपूर अडचणी आल्या. त्या सर्व अडचणींवर अमितने मात केली.

YouTube video player

हे सुद्धा वाचा

अमितच्या गोंदियातील घरी आनंद

अमितने पहिल्या दमातच यूपीएससीमध्ये 581 वा स्थान प्राप्त केले. अमितवर सर्वत्र गोंदिया जिल्ह्यात कौतुकांच्या वर्षांव होत आहे. गोंदिया येथील अमितच्या घरी पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंद साजरा केला गेला.

अमितच्या आई वडिलांना परिसरातील लोकांनी बुके देऊन अभिंदन केले. गोंदियाच्या अमित उंदीरवाडे याने पटकावले. सामान्य परिवारातील मुलाने युपीएससी स्थान मिळवले. म्हणून अमितचे सर्वत्र कौतुक होत आहे. अमितच्या घरी पेढे वाटून फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. परिसरातील लोकांनी अमितच्या आई वडिलांना पुष्गुच्छ देऊन अभिनंदन केले.

पडवीच्या सोहमचे यूपीएससी परीक्षेत यश

पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील पडवी या छोट्याशा गावातील सोहम मांढरे याने यूपीएससीच्या निकालात रँक मिळवत यश मिळवले. यूपीएससीच्या अंतिम निकालात सोहमने 218 वी रँक मिळवलीय. मागेही यूपीएससी परीक्षा पास होऊन त्यांनी 267 वी रँक मिळविली होती.

त्याही पुढे जाऊन त्यांनी दुसऱ्यांदा यूपीएससी परीक्षेत गगन भरारी घेत यश संपादन केलं. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे. सोहमने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.