एमआयडीसीमध्ये लागणाऱ्या आगीबाबत सरकार निर्णय घेणार: या जिल्ह्याचा होणार कायापालट…

| Updated on: Mar 04, 2023 | 11:50 PM

हिंदू गर्जना मोर्चा निघाला त्यातील लव्ह जिहाद, धर्मांतर कायदा,गोहत्या कडक करण्याच्या मागण्या मान्य कराव्यात आणि त्या संदर्भात कायदा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

एमआयडीसीमध्ये लागणाऱ्या आगीबाबत सरकार निर्णय घेणार: या जिल्ह्याचा होणार कायापालट...
Follow us on

सोलापूरः सोलापूर शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांसोबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, सोलापूर शहरातील अनेक समस्यांबाबत भाजपा पदाधिकाऱ्यांनी अडचणी मांडल्या आहे. त्यामुळे सोलापूर शहर विकासाच्या दृष्टीने त्याचा कायापालट करण्यासाठी भाजप प्रयत्नशील असणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच यावेळी अडचणी सोडवण्याचे पालकमंत्र्यांनीही यावेळी आश्वासन दिले आहे.

तसेच सोलापूर शहरातील स्मार्ट सिटी बाबत झालेल्या कामाची चौकशी करून त्याची तपासणी करण्याची माजी नगरसेवकांची मागणी होती. मात्र पालकमंत्र्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

स्मार्ट सिटीच्या प्रश्नांबाबत आणखी काही समस्या असतील भेटा असंही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी सोलापूर एमआयडीची मुद्दाही उपस्थित केला आहे.

सोलापूर एमआयडीसीमध्ये लागणाऱ्या आगीबाबतही निर्णय घ्यावा व रविवारी होणाऱ्या आढावा बैठकीत त्यावर निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यानी यावेळ सांगितले.

तसेच यावेळी सोलापुरात राज्यातील कार्यकर्त्यांबाबत एक मेळावा घेण्याची पदाधिकाऱ्यांची मागणीही यावेळी करण्यात आली.

सोलापूर भाजप उद्योग आघाडीकडून सांगण्यात आले असले तरी सोलापूर शहरातील उद्योगांची अडचणही नेहमी सांगितली जाते.

तर दुसरीकडे हिंदू गर्जना मोर्चा निघाला त्यातील लव्ह जिहाद, धर्मांतर कायदा,गोहत्या कडक करण्याच्या मागण्या मान्य कराव्यात आणि त्या संदर्भात कायदा करण्याची मागणी करण्यात आली आहे.त्यावर निर्णय शासन घेईल मात्र अशा घटना होऊ नयेत म्हणून पोलिसांनीही खबरदारी घेतली पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगिले.

भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तरी सोलापूर शहरात कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून अन्याय, पालकमंत्र्यांकडून निवेदन देण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आली. निराधार योजना, रेशन कार्ड यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. त्यामुळे निराधार योजनेची कमिटी नेमणूक करावी अशीही मागणी करण्यात आली आहे.