कल्याण : कल्याण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान एका जागेसाठी दोन उमेदवारांना समसमान मते मिळाली. पण अखेर एका लहान मुलाने शिवसेनेच्या पारड्यात यश दिलं आहे. दोन्ही उमेदवारांना समान मत पडल्याने गावात एकच गोंधळ उडाला. पण यासाठी चिठ्ठी उचलून विजयी उमेदवार घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे एका लहान मुलाने चिठ्ठी उचलली आणि शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. (Gram Panchayat Election Results 2021 Bharat Kene has been elected from ShivSena in kalyan )
आज राज्यात ग्रामपंचायतीचे निकाल येत आहेत. कल्याण तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीपैकी एक वरप ग्रामपंचायत ही बिनविरोध झाली आहे. उर्वरीत 20 ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज मतमोजणी झाली. टिटवाळा येथील सांगोडा कोंढेरी ग्रामपंचायतीची मत मोजणी सुरू असताना एका प्रभागात भरत केणे आणि कल्पेश पाटील या दोन्ही उमेदवाराना समसमान मते मिळाली. या दोघांना 184 मते मिळाली. हे पाहून सर्व हैराण होते.
अखेर कल्याणचे तहसीलदार मुख्य निवडणूक अधिकारी दीपक आकडे यांनी सोडत पद्धतीने चिट्ठी टाकून उमेदवारांचा भवितव्य ठरविण्याचा निर्णय घेतला. लहान मुलांच्या शोधासाठी प्रशासनाची धावपळ सुरु झाली. मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्र सुरू असलेल्या मतमोजणी केंद्र परिसरात राहणाऱ्या एका अधिकाऱ्याचा 5 वर्षाचा मुलगा पार्थ चौगले याला अधिकारी मतमोजणी केंद्रात घेऊन आले.
या मुलाने बरणीतून दोन पैकी एकाची चिट्ठी काढली आणि भरत केणे यांचे नशीब बलवत्तर ठरलं. भरत केणे हे शिवसेना समर्थक असल्याने कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पसरला आहे. इतकंच नाही तर विजयी झालेल्या भरत केणे यांनी चक्क पाच वर्षाच्या लहान पार्थ चौगलेला कडेवर घेऊन आनंद व्यक्त केला. यावेळी पराभूत झालेला उमेदवार कल्पेश पाटील यानेसुद्धा भरत केणे यांना सुभेच्छा दिल्या. (Gram Panchayat Election Results 2021 Bharat Kene has been elected from ShivSena in kalyan )
संबंधित बातम्या –
महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा जळगावात विजय, अंजली पाटलांचा विजय का अभिमानास्पद ?
(Gram Panchayat Election Results 2021 Bharat Kene has been elected from ShivSena in kalyan )