पुणे- यंदा दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदत वाढ दिली आहे. या मुदत वाढीमुळे विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह 20 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
यामुळे दिली मुदतवाढ
विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन ही मुदत वाढ देण्यात येणार आहे. या नियमित शुल्कानुसार विद्यार्थ्यांना येत्या 20 डिसेंबर 2021पर्यंत विलंब शुल्कासह 21 डिसेंबर 2021पर्यंत अर्ज करता येणार आहे. या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने दहावीच्या बोर्ड परीक्षेचा अर्ज करता येणार आहे. माध्यमिक शाळांमध्ये सरल डेटाबेसवरून नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे आहेत. अर्ज केल्यानंतर 2 जानेवारीपर्यंत 2022 शाळा विद्यार्थ्यांची चलन डाऊनलोड करून बँकेत शुल्क भरू शकतात. शाळांनी माध्यमाकडे प्री – लिस्ट जमा करण्याची अंतिम मुदत 4 जानेवारी 2022 पर्यंत आहे.
शाळेकडून भरावेत अर्ज
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरले जात असल्याने विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळेद्वारेच फॉर्म भरावे. असे आवाहन राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना केले आहे.
तुमच्याकडे असतील ‘या’पेक्षा अधिक सीम कार्ड तर होऊ शकतात बंद; दूरसंचार विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Aurangabad: विद्यापीठातल्या शिवाजी पुतळ्याच्या पायाभरणीत रायगडाची माती अन् चवदार तळ्याचे पाणी!