Video : ‘काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपचं भूत येऊ नये म्हणून वेशीवर शिवसेनेचा बोर्ड लावा’, गुलाबराव पाटलांचा शिवसैनिकांना मजेशीर सल्ला

| Updated on: Feb 14, 2022 | 7:42 PM

आपल्या गावात काँग्रेस, राष्ट्रवादीचे आणि भाजपाचे भूत येवू नये यासाठी वेशीवर शिवसेनेचा बोर्ड लावा असा सल्ला शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिला आहे.

Video : काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपचं भूत येऊ नये म्हणून वेशीवर शिवसेनेचा बोर्ड लावा, गुलाबराव पाटलांचा शिवसैनिकांना मजेशीर सल्ला
शिवसेनेचा बोर्ड लावा भूत येणार नाही-गुलाबराव पाटील
Follow us on

अहमदनगर : जिल्ह्यातील शिवसेना (Shivsena) पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे पार पडला. मंत्री शंकरराव गडाख यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. यात बोलताना शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी पुन्हा तुफान फटकेबाजी केली आहे.  शिवसेनेचे जुने कार्यकर्ते कोणत्याही पदाच्या अपेक्षेने काम करत नव्हते. बाबासाहेबांचा (Balasaheb Thackeray) आदेश शिरसावंद्य मानून शिवसैनिक काम करायचा. रड्या नावाचा कार्यकर्ता त्याकाळी नव्हता. आत्ताच्या शिवसैनिकांनी पुन्हा एकदा जोमाने काम करण्याची गरज आहे. यावेळी आपल्या गावात काँग्रेस, राष्ट्रवादीचे आणि भाजपाचे भूत येवू नये यासाठी वेशीवर शिवसेनेचा बोर्ड लावा असा सल्ला शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिला आहे. त्यामुळे या अनोख्या सल्ल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. शिवसेना हा पक्ष नाही, संघटना नाही, तर तो एक विचार आहे. शिवसेना ही मुसलमान विरोधी नसून देशविरोधी भूमिका घेणारांच्या विरोधात आहे. शिवसेनेमुळं माझ्या सारखे सर्वसामान्य कार्यकर्ते आज पुढं आलेत. तसेच सायकल चोरणारा मुख्यमंत्री झाला होता, असं म्हणत मतलब के लिए कुछ लोग बाप बदल लेते है, अशी घणाघाती टीका त्यांनी नारायण राणेंवरही केली आहे.

गुलाबराव पाटलांना जुना काळ आठवला

जर शिवसेना संपली तर तुमचं नुकसान होणार आहे. शिवसेना मोठी झाली तर फायदा तुमचा आहे. त्यामुळे तुम्ही कामाला लागा अशी सूचना गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलीय. आजची शिवसेना व पूर्वीची सेना यात फरक पडलाय. पूर्वीच्या काळी आम्ही सत्तेसाठी शिवसेनेबरोबर आलो नाही. त्याकाळी पोलीस आमच्या पाचवीला पुजलेला होता. त्यांचं आमचं जणू काही लव्ह मॅरेजच होतं, अशा विनोदी शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना जुना काळ आठवूण दिला आहे. तसेच त्यावेळी काँग्रेसची एक हाती सत्ता होती. सेनेच्या शाखेचा बोर्ड लागला की लगेच नोटीस यायची, असेही ते सांगयला विसरले नाहीत.

अनेकजण गेले तरी शिवसेना भक्कम

बाळासाहेब नसते तर माझ्या सारखा माणूस आमदार सोडा साधा सरपंचही झाला नसता. 25 वर्षांचा असताना मी शिवसेना जिल्हा प्रमुख झालो. 92 च्या दंगलीत आम्ही तिघे भाऊ अनेक महिने जेल मध्ये होतो. अशा परिस्थितीत शिवसेना उभी राहिली. आता फक्त कार्डापुरते आहेत काही लोक सेनेत. तुम्ही सेनेकडे मागतात मात्र तुम्ही संघटनेला काय दिले हेही बघा ना? असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचे कानही टोचले आहेत. तसेच अनेक लोक सोडून गेले मात्र शिवसेना अजूनही भक्कम आहे. भुजबळ गेले तेव्हा पहिला धक्का होता. नारायण राणे गेले, नेपोलियन तरी शिवसेना उभीच आहे. त्यानंतर राज साहेब गेले तरी शिवसेना उभीच आहे. असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच आपल्या विनोदी शैलीत, तेरा क्या होगा कालिया? म्हणत माझ्या भाषणाची पद्धतच तशी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मागे मी बोलता बोलता हेमामालिनी बोललो तर दोन दिवस तेच चालू होतं. मात्र माझ्या मनात तसं काही नव्हतं, असेही सांगायला ते विसरले नाहीत.

‘साडे तीन लोकांना अटक करा किंवा साडे तिनशे, पण आधी आरोपांची उत्तरं द्या’, किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरे, राऊतांना खोचक टोला

तुमच्या पार्ट्यांचे पैसे कुणी दिले? उत्तर द्या संजय राऊत, सोमय्यांचं थेट आव्हान

औरंगाबाद शिवसेना नेते चंद्रकांत खैरे मणिपूरमध्ये, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी!