सोलापूर – शिवजयंती (shiv jayanti) महाराष्ट्रात (maharashtra) वेगवेगळ्या पध्दतीने साजरी करण्याची अनोखी परंपरा महाराष्ट्रात अनेक दशकांपासून आहे. त्यामुळे जिथं गाव तिथं साजरी केली जाते. प्रत्येक ठिकाणी वेगळं कायतरी पाहायलं मिळत. परंतु कोरोनाच्या (corona)पार्श्वभूमीवर मागच्या दोन वर्षापासून शिवजयंती मोजक्या लोकांच्यामध्ये आणि अत्यंत साध्या पध्दतीने साजरी केली जात असल्याचे आपण पाहतोय. अजूनही कोरोनाचं संकट पुर्णपणे गेलेलं नाही त्यामुळे आजही राज्य सरकारच्या नियमावलीनुसार एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन केल जातं. काल रात्री विना परवानगी सोलापूरात गुलाल उधळीत शिवप्रेमींनी शिवजन्मोत्सव साजरा केला. त्यावेळी अचानक जमलेल्या तरूणांना तिथून पांगवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागलचं समजतंय तसेच सोलापूरातील खड्डा तालीम शिवजयंती मडळाने आंध्र, कर्नाटक आणि तेलंगणामधील एकूण 51 युवक मंडळाला शिवाजी महाराजांच्या साडेसहा फुटी मुर्तीचे वाटप करण्यात आलेय. कारण एव्हढचं आहे की, महाराजांच्या कार्य इतर राज्यातल्या लोकांना माहित व्हावं. साधारण 200 मंडळांना मुर्ती वाटप करण्यात आल्याचं समजतंय.
सोलापूर पोलिसांची कसरत
सोलापूर पोलिसांची प्रत्येकवेळी परवानगी घेऊन शिवजयंती साजरी करणा-या युवकांनी काल कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समजतंय. रात्री बारा वाजण्याच्या सुमारात अचानक शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हजारोंच्या संख्येने तरूण जमले. जन्मोत्सव साजरा करण्यासाठी जमलेल्या युवकांनी गुलालाची उधळण देखील केल्याचे समजते आहे. अधिक तरूण तिथं विनापरवानगी जमतं असल्याने पोलिसांची अचानक डोकोदुखी वाढली कारण राज्य सरकारकडून कोरोनाची नियमावली असल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने पाऊले उचलावी लागली. कारण सोलापुर शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ युवक जल्लोष करीत होते. पोलिसांनी तिथून त्यांना हटवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
सोलापुरातील शिवजयंती उत्सव मंडळाचा अनोखा उपक्रम
काही दिवसांपूर्वी कर्नाटकात शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील खड्डा तालीम शिवजयंती मडळाने एक अनोखा उपक्रम राबवलाय. शिवाजी महाराजांची किर्ती शेजारच्या राज्यातही पसरावी आणि त्यांच्या कार्याबद्दल आदर निर्माण व्हावा यासाठी आंध्र, कर्नाटक आणि तेलंगणामधील एकूण 51 युवक मंडळाला शिवाजी महाराजांच्या साडेसहा फुटी मुर्तीचे वाटप करण्यात आलेय. त्याचबरोबर नव्या पिढीला महाराजांच्या कार्याबद्दल उत्सुकता निर्माण व्हावी यासाठी 200 पेक्षा जास्त शिवमुर्तीचे वाटप करण्यात आलेय. त्याचबरोबर खड्डा तालीम मंडळाच्यावतीने रक्तदान शिबिर, व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेय. शिवमुर्ती वाटपाचे हे पाचवे वर्ष असल्याची माहिती मंडळाच्यावतीने देण्यात आली.