दत्ता कानवटे, औरंगाबाद : गेल्या काही महिन्यांपूर्वी गुणरत्न सदावर्ते हे कारागृहात गेले होते, त्यानंतर त्यांच्याच सोसायटीमधील काही महिलांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याच वेळी त्यांनी घरात गाढव पाळल्याचेही म्हंटले होते. त्यानंतर घरात पाळलेल्या गाढवाची जोरदार चर्चाही झाली होती. पण हे गाढव पाळण्यामागील कारण समोर आले नव्हते. यावर पहिल्यांदाच अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी स्पष्टीकरण दिले आहे. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी गाढव कुणी आणि का पाळले आहे, हे सांगितले आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हंटलय, आमच्या घरात गाढव माझ्या मुलीने पळाले आहे, त्याचं नाव मॅक्स आहे. आणि गाढवाचे दूध पोटदुखीवर औषध आहे, ते सहज उपलब्ध होऊ शकत नाही त्यामुळे मुलीने ते पाळलं आहे, हा संशोधनाचा भाग आहे म्हणून घरी गाढव पाळलं असल्याचे सदावर्ते यांनी म्हंटलं आहे.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या कुटुंबाला प्राणी, पक्षी पाळण्याचा छंद आहे,. घरात कुत्रे, गाढव, कबुतरे असे नियमात असणारे पशू पक्षांचे पालन करीत असल्याचे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले आहे.
गुणरत्न सदावर्ते यांचे वडील यांनाही कुत्रे पाळण्याची आवड होती, तशीच आवड माझ्या मुलीला असल्याचे म्हंटले आहे. सदावर्ते यांच्या मुलीचे नाव झेन सदावर्ते असं आहे.
पोटसुळ झाल्यावर गाढवाचे दूध गुणकारी असल्याचे सदावर्ते यांनी म्हंटलं आहे, ते सहज उपलब्ध होऊ शकत नाही, त्याबाबत मुलीगी झेन सदावर्ते यांनी घरात गाढव पाळले असल्याचे सदावर्ते यांनी सांगितले आहे.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या मुलीचे गाढवासोबतचे फोटोही सोशल मीडियावर उपलब्ध आहे, सदावर्ते यांची मुलगी झेन हीला राज्याचा बाल शौर्य पुरस्कार मिळाला तेव्हा चर्चेत आली होती.