Chagan Bhujbal : भुजबळांसारखा प्रामाणिक माणूस नाही, गुणरत्न सदावर्ते पण मैदानात, जरांगेवर टीकेचा बाण

| Updated on: Dec 18, 2024 | 6:48 PM

Gunaratna Sadavarte Praised Chagan Bhujbal : छगन भुजबळ यांचे नाराजी नाट्य सद्या राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहे. अनेक दिग्गज नेते त्यावर मौन बाळगून असताना कार्यकर्ते, ओबीसी नेते त्यावर थेट प्रतिक्रिया देत आहेत. आता गुणरत्न सदावर्ते त्यांच्या समर्थनासाठी मैदानात उतरले आहे.

Chagan Bhujbal : भुजबळांसारखा प्रामाणिक माणूस नाही, गुणरत्न सदावर्ते पण मैदानात, जरांगेवर टीकेचा बाण
गुणरत्न सदावर्ते, छगन भुजबळ
Follow us on

मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने छगन भुजबळ नाराज आहेत. ते लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यसभेची चर्चा, नंतर लोकसभेला पाठवण्याचा शब्द आणि मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याचे शल्य भुजबळांनी एका ओळीत त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. छगन भुजबळ यांचे नाराजी नाट्य सद्या राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहे. अनेक दिग्गज नेते त्यावर मौन बाळगून असताना कार्यकर्ते, ओबीसी नेते त्यावर थेट प्रतिक्रिया देत आहेत. आता गुणरत्न सदावर्ते त्यांच्या समर्थनासाठी मैदानात उतरले आहे. धाराशिव येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काँग्रेसवर सदावर्तेंचा हल्लाबोल

अमित शाह यांच्या कालच्या संसदेतील वक्तव्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेसची डिव्हाइड अँड रुल पॉलिसी आहे. हलकट पॉलिसी आहे. एखाद्या वाक्याची तोडफोड करून सांगण्याची प्रवृत्ती आहे. एखाद्या गोष्टीत हे कुठपर्यंत नीच पातळी गटातील ते सांगता येत नाही. बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक हत्या काँग्रेसने केली, असा घणाघात सदावर्ते यांनी केला.

हे सुद्धा वाचा

नेहरू संविधानासोबत कसं वागत होतं हे, दाखवण्याचा अमित शहा यांचा प्रयत्न होता, असे ते म्हणत होते. त्याची तोडफोड करण्याचं काम काँग्रेस करत आहे. काँग्रेस, खर्गे आणि राहुल गांधी यांना मला सांगायचं की तोडफोड करून तुम्ही वनवा लावण्याचे काम करू नका. येणारे न्यायमूर्ती शेड्युलकास्ट समाजाचे असतील, हा संविधानाचा विजय आहे, असे ते म्हणाले.

आरोपीला शिक्षा करा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. मी कोणत्या हत्येचे समर्थन करत नाही. पोलीस अधिकारी आहेत त्यांनी पोलिसांसारखंच काम केलं पाहिजे. ते पोलीस बौद्ध समाजातले असोत, मराठा समाजाचे असोत किंवा वंजारी समाजातील असो. वर्दी घातल्यानंतर समाज नाही. वर्दी घातल्यानंतर आरोपीला शिक्षा व्हावी हीच भूमिका असली पाहिजे, असे ते म्हणाले. त्याच्यावर सरकार तपास यंत्रणा योग्य तो रिपोर्ट सादर करतील मी त्याचे मेडिकल रिपोर्ट पाहिलेले नाहीत. परभणी येथील घटनेचा मेडिकल रिपोर्ट पाहिला आहे. अशोक गोरमाड कुठल्या समाजाचा आहे हे मला माहित नाही त्याच्यावर 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

भुजबळ हे प्रामाणिक

छगन भुजबळ यांच्या नाराजीवर त्यांन मत व्यक्त केले. आपण सकाळीच भुजबळ यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगीतले. प्रमाणिकपणा याचं दुसरं नाव भुजबळ आहेत. भुजबळ यांच्यासोबत ओबीसी समाज आहे, अशी स्तुति त्यांनी केली. तर जरांगे यांच्यासारख्या दिवाणी मोटरसायकल सारखे त्यांचे काम नाही, असे ते म्हणाले. व्यक्ती स्वातंत्र्यावर काँग्रेसने गदा आणली. आईच्या दरबारात माझ्यासारख्या भाविकाला झालेली शिवीगाळ भावना दुखावणारी असल्याचे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.