हरियाणातील निकालाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? जागावाटपात कोणाला झुकतं माप

| Updated on: Oct 09, 2024 | 6:56 PM

महायुती आणि महाविकासआघाडीमध्ये जागा वाटपासाठी बैठका सुरु आहेत. पण त्याआधी हरियाणा विधानसभेचा निकाल आल्याने त्याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर देखील होणार आहे. महाराष्ट्रात भाजपची जागा वाटपात ताकद वाढणार आहे तर काँग्रेसला मात्र काहीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

हरियाणातील निकालाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? जागावाटपात कोणाला झुकतं माप
Follow us on

हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश भरला आहे. याचा राज्य आणि राष्ट्रीय राजकारणावर नक्कीच परिणाम होणार आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. कारण लवकरच तीन राज्यात निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाच्या जागा कमी झाल्याने भाजपच्या चिंता वाढल्या होत्या. पण त्यानंतर झालेल्या निवडणुकीतील विजयामुळे कार्यकर्ते पुन्हा कामाला लागले आहेत. पण या निकालांनी महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्लीतील काँग्रेसच्या मित्रपक्षांना आयतं कुलीत मिळालं आहे. तर या निकालांमुळे भाजपची मित्रपक्षांसोबतची जागा वाटपात ताकद वाढली आहे.

संजय राऊत यांची प्रतिक्रिया

निवडणुकीचे निकाल येताच संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली. ते म्हणाले की, भाजपने निवडणूक चमकदारपणे लढवली. भाजपने निवडणूक चांगली लढवली. भाजपने हरलेली लढाई जिंकली. पण काँग्रेसकडे स्पष्टपणे बोट दाखवत संजय राऊत म्हणाले की, इंडिया ब्लॉकने एकत्र निवडणुका लढवल्यामुळे आम्ही काश्मीर जिंकलो. हरियाणात पराभव झाला कारण काँग्रेसला वाटले की आम्हाला कोणाची गरज नाही, आम्ही स्वतः मजबूत आहोत आणि जिंकू.

संजय राऊत यांच्या या वक्तव्याच्या अर्थ स्पष्ट आहे की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जेव्हा जागावाटपाचा प्रश्न येतो तेव्हा उद्धव ठाकरेंची शिवसेना स्वतःसाठी जास्तीत जास्त जागांची मागणी करेल आणि काँग्रेसला त्यांच्याशी वाटाघाटी कराव्या लागतील. शिवसेना (यूबीटी) नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनीही म्हटले क,. काँग्रेसने आघाडी धर्माचे पालन करावे. काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे. आगामी निवडणुका काँग्रेस आघाडीसोबत लढवल्या तर निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी प्रियांका चतुर्वेदी यांनी केलीये.

प्रिंयका चतुर्वेदी काय म्हणाल्या

संजय राऊत यांच्यानंतर प्रियंका चतुर्वेदीही तेच म्हणाल्या की, जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीने चांगले काम केले आणि सरकार स्थापन होणार आहे, परंतु हरियाणामध्ये काँग्रेसने ही लढाई लढवली होती, तिथे युती होऊ शकली नाही आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. महाराष्ट्रात काँग्रेससोबत शरद पवार यांची राष्ट्रवादीही आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसही राज्यात जास्तीत जास्त जागांची मागणी करत आहे.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हा क्रमांक एकचा पक्ष होता, याची आठवण काँग्रेसने महाराष्ट्रातील मित्रपक्षांना करून दिली आहे. जयराम रमेश म्हणाले, “महाराष्ट्रात, मला आठवण करून द्यायची आहे की लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रथम होती आणि युतीचा धर्म हा आहे की आपण आपापसात विषयांवर चर्चा करू, मीडियाद्वारे नाही. महाराष्ट्रात आमची युती आहे, युती मजबूत करण्याची जबाबदारी आमची आहे. आमच्या मित्रपक्षांबद्दल आम्ही काहीही बोलणार नाही.”

काँग्रेस तीन महिन्यांपूर्वीचे रिपोर्ट कार्ड मित्रपक्षांना दाखवत आहे, मात्र मित्रपक्ष काँग्रेसला ताजे रिपोर्ट कार्ड दाखवत आहेत. त्यामुळे जागावाटपासाठी शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) हे जागा वाटपात अधिक जागा मागतील हे स्पष्ट आहे.

तर हरियाणातील निकालामुळे महाराष्ट्रात भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवावी, अशी शिवसेनेची इच्छा आहे. पण भाजपने याबाबत आपली रणनीती जाहीर केलेली नाही. या निवडणुकीच्या निकालांनी भाजपला नैतिक बळ दिले आहे की ते जागावाटपापासून मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यापर्यंत जास्तीत जास्त वाटाघाटी करु शकतात.