मुंबई : आज पहाटेपासूनच हसन मुश्रीफ यांच्यासह नातलगांवर ईडीने छापेमारी सुरू केली आहे. जवळपास सात ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे. त्यावर हसन मुश्रीम यांनी माध्यमांसमोर येऊन सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये हसन मुश्रीफ यांनी यांनी सर्व आरोप फेटाळून लावत सत्ता आली तरी कारवाई करतात याचं विशेष वाटतं म्हणून भाजपला टोला लगावला आहे. यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले, आज सकाळी सहा वाजल्या पासून माझ्यासह मुलाच्या, मुलीच्या, कारखान्यावर, पुण्यातील काही व्यक्तींच्या मालमत्तेवर छापा ईडीने धाड टाकली आहे. याबाबत आता नवीन काय आहे माहिती नाही पण चार वर्षापूर्वी आमची चौकशी झाली आहे. किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर मी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर उत्तरे दिली आहे. त्यामुळे आता सायंकाळी छापेमारी संपल्यावर नवीन काय आहे ते कळेल असंही हसन मुश्रीफ यांनी म्हंटलं आहे.
साखर कारखान्याच्या आणि आमच्या चार वर्षापूर्वी चौकशी झाल्या होत्या, तेव्हा काहीही समोर आले नव्हते, किरीट सोमायया यांनी आरोप केले होते त्याची उत्तरे मी दिली होती.
त्यानंतर किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपावरून मी त्यांच्या विरोधात दोन मानहाणीचे दावे दाखल केले होते, एक कोटीचा आणि एक पन्नास लाखाचा असे दोन दावे दाखल आहे.
मी मंत्री असतांना काळा पैसा घेऊन कारखान्यात लावल्याचा माझ्यावर आरोप आहे. याशिवाय न्यायालयात कारखान्याच्या बाबत इतर तक्रार आहे, त्यानुसार स्थगिती मिळाली आहे.
माझ्या मुलाच्या साखर कारखान्यात शेतकऱ्यांचे पैसे आहे, कुठल्या लिलावात कारखाना घेतला नाही, कारखान्याची उभारणी वेगळ्या पद्धतीने झाली आहे. आता कारखान्यात बदल झाला आहे.
पुण्यातील चंद्रकांत गायकवाड हे माझे चांगले मित्र आहेत. पण त्यांच्यासोबत कुठलाही व्यावसायिक संबंध नाही, त्यांच्या कुठल्याही कंपनीशी माझा व्यवहार नाही.
साखर कारखाना कुणी लिलावत घेतला नाही, पुण्यातील कंपनी चालवत नाही, कारखान्यावर दोन वर्षापूर्वीच संचालक मंडळ निवडून आले आहे.
जावायचा आणि त्या कंपनीचा कुठेही संबंध नाही. मंत्री असतांना एक जीएसटी टेंडर काढण्यात आले होते. ते टेंडर दोन महिन्यातच रद्द करण्यात आले होते. त्यामुळे टेंडरचा विषय येतच नाही.
किरीट सोमय्या जे तक्रार करत आहे, त्याला कुठलाही आधार नाही, बेनामी संपत्ती बाबत न्यायालयातून मला दिलासा मिळाला आहे. सत्ता येऊन सहा महीने झाले आहे तरी हे कशासाठी केले आहे काही कळत नाही.
मुलीच्या सासूला, सुना आहे, नातवंड आहे, त्यांना भयभीत करून त्रास देण्याचा प्रयत्न आहे, सत्ता आल्यानंतरही हे थांबत नाही याचं मला विशेष वाटतं असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी भाजपला टोला लगावला आहे.
इन्कम टॅक्सबाबत मला कुणीही बोलावले नाही, माझ्या मुलाला बोलावलं होतं त्यांना नोटिस आली होती असाही खुलासा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी केला आहे.