अतिवृष्टीमुळे रेल्वे रुळावर पाणी, लांब पल्ल्याच्या गाड्या थांबल्या, अनेक दुसऱ्या मार्गाने वळवल्या

| Updated on: Jul 26, 2024 | 2:50 PM

rain in maharashtra: मध्य रेल्वेने सहा दिवसांचा मेगा ब्लॉक घेतला आहे. पुणे विभागात होणाऱ्या कामांमुळे 27 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान मेगा ब्लॉक घेतल्या आहे. त्यामुळे 19 गाड्या रद्द केल्या आहेत तर 22 गाड्यांचे मार्ग बदलले आहे. यामुळे सोलापूर पुणे इंटरसिटी 3 दिवस रद्द केली आहे.

अतिवृष्टीमुळे रेल्वे रुळावर पाणी, लांब पल्ल्याच्या गाड्या थांबल्या, अनेक दुसऱ्या मार्गाने वळवल्या
कोळदा चिंचपाडा दरम्यान रेल्वे रुळावरुन पाणी
Follow us on

नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. त्याचा फटका रेल्वे प्रशासनाला बसला आहे. यामुळे सुरत-भुसावळ रेल्वे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. कोळदा चिंचपाडा दरम्यान रेल्वे रुळावरुन पाणी वाहत असल्याने रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे अनेक रेल्वे गाड्या स्टेशनवर थांबून आहे. गेल्या दीड ते दोन तासांपासून रेल्वेची वाहतूक बंद झाली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या थांबल्याने स्थानिक प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहे. दरम्यान, रेल्वे सेवा कधी सुरू होणार याबाबत प्रशासनाकडून कुठलीही सूचना नाही. यामुळे काही प्रवाशी बस आणि इतर मार्गाने परत जात आहे. परंतु लांब पल्ल्याचे प्रवाशी अडकले आहेत.

रेल्वेला कर्मचारी वाट दाखवतानाचा व्हिडिओ व्हायरल

कोलदा ते चिचपाडा दरम्यान मुसळधार झालेला पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी आले आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी शिरल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांकडून रेल्वेला वाट दाखवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.नंदुरबार जिल्ह्यात आणि गुजरात राज्याच्या डांग जिल्ह्यात होत असलेल्या पावसाच्या फटका रेल्वेला बसला आहे. सध्या पाऊस ओसरला असला तरी सकल भागात पाणी साचले आहे.

हे सुद्धा वाचा

अनेक रेल्वे गाड्या वळवल्या

सुरत भुसावल रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प असल्याने अनेक एक्सप्रेस गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. अनेक गाड्या नंदुरबार भुसावळ रेल्वे स्थानकावर अडकून पडल्या आहेत

  • 12656 चेन्नई ते अहमदाबाद एक्सप्रेस भुसावळ खंडवा मार्गे,
  • 07055 काचीगुडा ते हिसार ही एक्सप्रेस इटारसी भोपाल मार्गे,
  • 12834 हावडा ते आमदाबाद ही एक्सप्रेस रतलाम मार्गे
  • 15068 बांद्रा ते गोरखपूर,
    12833 आमदाबाद ते हावडा, 20824 अजमेर ते पुरी या एक्सप्रेस भरूच मार्गे वळवण्यात आल्या आहेत.
  • उधान ते नंदुरबार आणि नंदुरबार ते उधना जाणारी मेमो रद्द करण्यात आली आहे.

मध्ये रेल्वेच्या 27 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेने सहा दिवसांचा मेगा ब्लॉक घेतला आहे. पुणे विभागात होणाऱ्या कामांमुळे 27 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान मेगा ब्लॉक घेतल्या आहे. त्यामुळे 19 गाड्या रद्द केल्या आहेत तर 22 गाड्यांचे मार्ग बदलले आहे. यामुळे सोलापूर पुणे इंटरसिटी 3 दिवस रद्द केली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सहा दिवसांचा मेगाब्लॉक असणार आहे. दौंड रेल्वे स्थानकावरील विविध कामाकरिता गाड्या रद्द तसेच मार्ग परिवर्तन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेगा ब्लॉकमुळे सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस 3 दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. 3 दिवस ट्रेन रद्द केल्याने प्रवाशांची तारांबळ उडणार आहे.

नंदुरबार स्थानकावर थांबलेल्या गाड्या

सोलापूर रेल्वे विभागातून मार्ग बदल केलेल्या गाड्या खालीलप्रमाणे

  • लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम एक्स्प्रेस ही गाडी 29 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान पुर्ण-मिरज-कुर्डुवाडी मार्गे
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बंगळुरू एक्स्प्रेस ही गाडी 29 जुलै ते ते 1 ऑगस्टदरम्यान पुणे-मिरज-कुर्डूवाडी मार्गे
  • बंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस ही गाडी 27 ते 31 जुलैपर्यंत कुडुवाडी-मिरज-पुणे मार्गे
  • नागरकोयल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस ही गाडी 28 जुलै रोजी गुंतकल-बल्लारी-हुबळी-मिरज-पुणे मार्गे
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागरकोयल ही गाडी 29 जुलै रोजी पुणे- मिरज- हुबळी-बल्लारी- गुंतकल मार्गे,
  • चेन्नई – एकतानगर एक्स्प्रेस ही गाडी 28 जुलै रोजी गुंतकल- बल्लारी- हुबळी- मिरज-पुणे मार्गे धावणार आहे.