राज्यात सर्वत्र पावसाचा जोर सुरु आहे. महाराष्ट्रात सोमवारी सर्वच जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तसेच रत्नागिरी, पुणे, सातार या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. सोमवारी सकाळी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु रविवारी मध्यरात्रीपासून झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पूर परिस्थिती निर्माण झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच नद्या अद्यापही धोक्याच्या पातळीवर आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काजळी, अर्जुना, कोदावली, शास्त्री, मुचकुंदी नदी इशारा पातळीवर आली आहे. चांदेराई बाजारपेठेतील पाणी ओसरले आहे.
हवामान विभागाचा आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. सोमवारी सुद्धा हवामान खात्याचा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे. मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक सखल भागात पाणी देखील साचले आहे.
Raining heavily ☔
Navi Mumbai
Kalamboli/ panvel / kamothe city
10.48 AM#mumbairains@IndiaWeatherMan @rushikesh_agre_ @shetty_athreya @Akshay_Sunil_ @Hosalikar_KS
{ मुसळधार पाऊस,
नवी मुंबई, कळंबोली, कामोठे, पनवेल } pic.twitter.com/UyRU4JmVpK— hii (@sagar_096) July 7, 2024
मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील आंबोली सिजर रोड परिसरातील झोपडपट्टीतील अनेक घरात पाणी घुसल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे रविवारी मध्यरात्री झोपेत असलेल्या नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाल्याच दिसून आले. गटाराचे पाणी घरात शिरल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरातील सामान देखील पाण्यामुळे भिजून गेले आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या नुकसानीचा सामना देखील करावा लागत आहे. मुसळधार पावसानंतर कांदिवली गावात पाणी तुंबले आहे. कांदिवली गावात अनेक वाहने पाण्याखाली बुडाली आहेत.
जळगाव शहरातील खंडेराव नगरात नाल्यात चेंडू घेण्यासाठी उतरलेल्या सहा वर्षीय चिमुकला हा पुराच्या पाण्यात वाहून गेला. या मुलाचा मृतदेह रविवारी राष्ट्रीय महामार्गावरील पोद्दार शाळेजवळील नाल्याजवळ अडकलेला आढळून आला. सचिन राहुल पवार (वय ६, रा.हरी विठ्ठल नगर, जळगाव) असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.