हिंगोली | 6 जानेवारी 2024 : हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडली. या बैठकीमध्ये निधी वितरित करण्याच्या कारणावरून आणि टक्केवारीच्या कारणावरून हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्यामध्ये चांगली जुंपली. या बैठकीमध्ये या दोन्ही लोकप्रतिनिधींनी एकमेकांना चक्क अश्विल भाषेमध्ये शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची Tv9 मराठी पुष्टी करत नाही. पण ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपवरुन सर्वसामान्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.
हेमंत पाटील – हिंमत असेल तर या जिल्ह्यामध्ये
अब्दुल सत्तार – मी घाबरतो का? (शिवीगाळ)
हेमंत पाटील – सहा-सहा महिने झाले मिटींग घेत नाही. लाज वाटली पाहिजे. शे# खाता
अब्दुल सत्तार – तू शे# खाणारा असला तरी मी शे# खाणारा नाही… (शिवीगाळ)
अब्दुल सत्तार – जिल्हा अधिकारी तुला अहवाल देतो का? तुझ्या परवानगीने करतो का?
हेमंत पाटील – मला मागच्या वर्षीचा हिशोब द्या. मागच्या वर्षीचं काय केलं?
अब्दुल सत्तार – तुम्ही पुढे चला. मला विचारल्याशिवाय कोणाचाही आवाज चालणार नाही.
हेमंत पाटील – आवाज दाबतो का? आवाज असा दाबू शकत नाही.
अब्दुल सत्तार – हो हो मला सगळं माहिती आहे.
हेमंत पाटील – अरे काय माहिती आहे तुला? ये इकडे जिल्ह्यामध्ये ये… तुला दावतो
अब्दुल सत्तार – अरे तुझ्या घरी येतो… अरे तुझ्या…(शिवीगाळ)… काय दम आहे…(शिवीगाळ).. हे शिकवायची गरज नाही. हा दबाव दुसऱ्यावर टाका. माझ्यावर चालणार नाही. चला जिल्हाधिकारी मिटींग चालू करा. आता मला विचारल्याशिवाय कोणाला चालू करायचं नाही. जे सन्माननीय सदस्य बोलतील त्यांनी हात वर करा. मी त्यांना बोलण्याची परवानगी देईन. चला सुरु करा.