कोल्हापूरः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिंदे गटातील मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करत त्यांच्या प्रमाणेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून सुटका करून घेतली असं म्हणत एकनाथ शिंदे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केली. त्यामुळे राजकीय वर्तुळापासून ते सर्वसामान्यापर्यंत या प्रकरणी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
त्यावरूनच आता कोल्हापूरमधील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत आग्र्यातून सुटकेची तुलना शिंदेंच्या छोटाश्या बंडाशी करत असतील तर ही लाजिरवाणी गोष्ट असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मंगल प्रभात लोढा
मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना केली असल्याने त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
याप्रकरणी आता इतिहास संशोधक, इतिहासकारांमधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलल्यानंतर आता इंद्रजित सावंत यांनी इतिहासातील संदर्भ दिला आहे.
त्यांनी लोढा यांचा इतिहास कच्चा असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर शिवछत्रपतींची तुलना जगातल्या कुठल्याही व्यक्तीशी होऊ शकत नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर होत असतील तर हे चुकीचे आहे म्हणत लोढा शिवछत्रपतींचे आणि एकनाथ शिंदे यांची तुलना करत असतील तर त्यांचा इतिहासाचा अभ्यास कच्चा आहे ते आणि ते ढ आहेत असा टोलाही त्यांना लगावण्यात आला आहे.
इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी मंगल प्रभात लोढा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांनी हिंदू-मुस्लिम असा भेदभाव करणाऱ्यांनाही त्यांनी जोरदार टोला लगावला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे आहेत आणि त्यामध्ये हिंदू मुस्लिम असे सर्वच जातीचे लोक होते अशीही माहिती त्यांनी यावेळी सांगितली. त्यामुळे शिवाजी महाराजांना एका धर्माचा राजा म्हणनंही चुकीचं आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिवाजी महाराज हिंदू होते पण हिंदुत्ववादी नव्हते असा इतिहासातील संदर्भ देत आत्ताचे हिंदुत्व विशिष्ट धर्माला टार्गेट करणारे आहे अशी खोचक प्रतिक्रियाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.