महायुतीला महाराष्ट्रात किती जागा मिळणार, अनिल थत्ते यांची मोठी भविष्यवाणी

| Updated on: May 27, 2024 | 9:19 PM

राज्यात पाचही टप्प्यातील निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले असून आता ४ जून रोजी लागणाऱ्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात महायुतीने एकत्र निवडणूक लढवली होती. त्यामुळे महायुतीला किती जागा मिळतील याचा अंदाज अनिल थत्ते यांनी वर्तवला आहे.

महायुतीला महाराष्ट्रात किती जागा मिळणार, अनिल थत्ते यांची मोठी भविष्यवाणी
Follow us on

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. पण त्याआधीच राजकीय विश्लेषक आपले अंदाज जाहीर करत आहेत. महाराष्ट्रातील पाचही टप्प्यातील मतदान पार पडलं असून उमेदवारांचं भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. महाराष्ट्रात महायुतीला किती जागा मिळणार याबाबत आता अनिल थत्ते यांनी भविष्यवाणी केली आहे. अनिल थत्ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने चारशे पारचा नारा इतका लावला होता की, त्यांना साडेतीनशे जागा जरी मिळाल्या तरी लोक म्हणतील की चारशे कुठे मिळाले. यात महाराष्ट्राचा वाटा सगळ्यात मोठा असेल असं त्यांनी गृहीत धरलं होतं. पण वातावरण इतकं विचलित आणि गढूळ झालं होतं आता संभ्रम निर्माण झाला आहे.

अनिल थत्ते यांनी सांगितले की, माझा अंदाज असा आहे 35 ते 40 जागा महायुतीला येतील. महायुतीला 35 ते 40 जागा मिळतील असा माझा 100% विश्वास आहे. म्हणजेच आठ ते तेरा जागा महाविकासआघाडीला मिळतील. महाआघाडीने प्रचारात घेतलेले दोन मुद्दे खूप महत्त्वाचे ठरले. बहुमत मिळाले तर संविधान बदलतील आणि आपल्या समाजात बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाबद्दल नातं जपलेले अनेक लोकं आहेत. त्यामुळे ते लोक विचलित झाले त्यात त्यांना यश मिळाले.

संविधानाबरोबरच हुकुमशाही देखील मुद्दा आहे. त्यामुळे मुस्लीम वर्ग आणि दलित वर्ग दुखावला गेला आहे. तर महायुतीने केवळ मोदींचा चेहरा हा एकच मुद्दा मांडला आहे. महाराष्ट्रात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये इतर राज्यांमध्ये दिसतो तेवढा कडवटपणा नाही. त्यामुळे हिंदू-मुस्लीम हा मुद्दा महाराष्ट्रात फार चालेल असं मला वाटत नाही.

श्रीराम मंदिराचा मुद्दा देखील मला वाटत होतं की इलेक्शन होईपर्यंत वातावरण चैतन्यमय ठेवेल मात्र हा मुद्दा कुठेतरी विरला. सहानुभूती नक्की मिळाली.

कोण आहेत अनिल थत्ते?

अनिल थत्ते हे ज्योतिष विश्वात आता एक मोठे नाव आहे. अनिल थत्ते या अगोदर पत्रकार होते. करिअरच्या सुरुवातीच्या काळात ते गगनभेदी नावाचे मराठी पब्लिकेशन चालवत असत. बिग बॉसमध्ये देखील ते दिसले होते. त्यावेळी देखील ते चर्चेत होते.