नाशिकः नाशिक महानगरपालिकेने सुरू केलेल्या सिटीलिंक बससेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून, दिवसाकाठचे उत्पन्न तब्बल 10 लाख रुपयांपेक्षाही पुढे गेले आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या या बस सेवेला अच्छे दिन आल्याचे दिसत आहे. हा राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या संपाचा परिणाम असला, तरी प्रवाशांनी देखील खासगी बसचा प्रवास न करता सिटीलिंकलाच प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात बससेवेचा आणखी विस्तार झाल्यानंतर हा उत्पन्नात वाढच होणार आहे.
ग्रामीण भागात प्रतिसाद
सिटीलिंक बससेवेची 8 जुलै पासून सुरुवात झाली आहे. त्यात पाच टप्प्यात 250 बस रस्त्यावर उतवण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत 39 मार्गावर 120 बस रस्त्यावर उतवण्यात आल्या असून, पुढील आठवड्यात आणखी चार नवीन मार्गावर बस सुरू केली जाणार आहे आणि 30 बस देखील वाढणार आहेत. दरम्यान, सध्या राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. त्यामुळे खासगी वाहनातून प्रवास करताना अव्वाच्या सव्वा लूट सुरू आहे. हे पाहता सिन्नर ,ओझर, त्रंबकेश्वर, भगूर, गिरणारे, सायखेडा, मखमलाबाद या ग्रामीण भागातून सिटीलिंक बसला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
आणखी दोन ठिकाणी सेवा
ऑक्टोबर महिन्यापासून राज्य शासनाने कोरोना निर्बंध कमी केल्यानंतर बसची मागणी वाढली. शनिवारी, रविवार या सुटीच्या दिवशी देखील प्रवाशांची गर्दी असल्याने यातून रोजचे उत्पन्न दहा लाखाच्या पुढे पोहोचले आहे. संपूर्ण बस रस्त्यावर उतरविल्यानंतर प्रवाशांची गर्दी वाढून तोटा सहजपणे भरून निघेल आणि आता पुढच्या काही दिवसांत ग्रामीण भागातील दिंडोरी, पिंपळगाव बसवंत या दोन ठिकाणी देखील बससेवा सुरू केली जाणार आहे, अशी माहिती सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नाशिक महानगरपालिकेचे अधीक्षक अभियंता यांनी दिली.
संपात दिली साथ
एकीकडे एसटीचा राज्यव्यापी संप सुरू. त्यात नाशिक उद्योनगरी. ग्रामीण भागातून अनेक कामगार नाशिकमध्ये रोजगारासाठी येतात. त्यांना रोज खासगी वाहनाने प्रवास करून येणे अवघड असते. सातपूर भागात अनेक कामगारांचा रोज राबता असतो. त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवण्यासाठी सिटीलिंक बससेवेने उत्तम जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे हे कामगार रोज सिटर रिक्षातून असुरक्षित प्रवास करण्याऐवजी थेट सिटीलिंक बससेवेचा पर्याय निवडत आहेत.
Nashik: साहित्य संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक विश्वास पाटील, गीतकार जावेद अख्तर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारhttps://t.co/uuaiLJG8bv#Nashik|#SahityaSammelan|#ChiefMinisterUddhavThackeray|#GuardianMinisterChhaganBhujbal|#NovelistVishwasPatil|#LyricistJavedAkhtar
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 21, 2021
इतर बातम्याः