मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी दोन दिवसांपूर्वी पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकून खळबळ उडवून दिली होती. आजही त्यांनी एक पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना दिला. वक्फ बोर्डाच्या एका सदस्याचे दाऊदशी संबंध असल्याचं संभाषण असल्याचे पुरावे या पेन ड्राईव्हमध्ये (pen drive) आहेत. त्यावरून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी फडणवीसांना टोला लगावताना फडणवीस हे डिटेक्टिव्ह आहेत का असं म्हटलं होतं. पत्रकारांनी फडणवीस यांना नेमका हाच प्रश्न केल्याने फडणवीसांनी वळसे पाटलांना चिमटा काढला. मी एक एबीआय काढला आहे. फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असं त्याचं नाव आहे. अरे प्रकरणं बाहेर काढणं हे माझं कामच आहे. मी विरोधी पक्षनेता आहे. विरोधी पक्षाकडे सोशित पीडित लोक येत असतात. ते अशा गोष्टी आमच्याकडे आणून देतात. अजूनही काही गोष्टी येणार आहेत. त्या गोष्टी मला मांडाव्या लागतात. सोशित ते माझं कामच आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मीडियाशी संवाद साधताना फडणवीस यांनी हा टोला लगावला.
देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना अनेक गोष्टींकडे लक्ष वेधलं. मी सरकारला पेन ड्राईव्ह दिला आहे. त्यातून गिरीश महाजन यांच्याकडे कशी रेड मारायची आणि त्यांना कसं अडकवायचं हे दिसून येतं. हे प्रकरण सीबीआयला द्यायला हवं होतं. पण त्यांनी दिलं नाही. दिलीप वळसे पाटील हे मातब्बर आणि अनुभवी नेते आहेत. तेही आज बोलताना अडखळत होते. उत्तर चुकीचं देतोय हे त्यांना माहीत होतं. पण या प्रकरणाची चौकशी सीबीआयला देत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. त्यासाठी कोर्टात जाऊ. कोर्टात गेल्यावर आणखी मोठ्या षडयंत्राचा पर्दाफाश होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
वक्फ बोर्डाचे सदस्य मुदस्सीर लांबेंची क्लिप दिली आहे. या सरकारमध्ये ज्या लोकांची दाऊदसोबत जवळीक दाखवली जाते त्यांना प्राधान्य आहे. अशा लोकांची अपॉईंटमेंट होते. निवडून आले ते सांगत आहे. पण त्याची पद्धत काय आहे पाहू. त्यांचा राष्ट्रवादीशी काय संबंध जगजाहीर आहे. दाऊदशी संबंधित लोकांबाबत त्यांचं विशेष प्रेम दिसतंय, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
यावेळी त्यांनी प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं. 8-8 तास बँकेत बसून ज्या पद्धतीने माहिती घेतली जात आहे, त्यावरून दरेकरांना टार्गेट केलं जात आहे. पहिल्या प्रकरणात काही मिळालं नाही. दुसऱ्या प्रकरणात ओढून ताणून केलं जात आहे. त्यांनी केस केली तर आम्ही कोर्टात जाऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं.
माझ्यावर हक्कभंग आणला तर त्याला मी उत्तर देईल. मी जे केलं ते हक्कभंगाच्या कक्षेत बसत नाही. सरकार उघडं पडत आहे. त्यामुळे काही लोकांना त्रास होत आहे. त्यावर कारवाई होईल. फोन टॅपिंग प्रकरणात मागणी करू असं म्हटलं नाही. मी पेन ड्राईव्ह दिला होता. मी आठवडाभरात कोर्टात जाणार. त्यात व्यक्तिरिक्त पुरावे आहेत. कोर्टात किंवा सीबीआयकडे हे पुरावे देऊ, असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
Video: 5 जणांचा जीव घेणारी बोलेरो गाडी ट्रकवर कशी धडकली? बुलडाण्याचा भीषण अपघात CCTV मध्ये कैद