पुणे : मार्च आणि एप्रिल महिना उन्हाचा तडाखा देणारा असतो. परंतु या महिन्यात राज्यातील हवामानात सातत्यानं बदल (Climate Change) होत होता. कधी उन्हाचा कडाका तर कधी अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे. एप्रिल महिन्यात अनेक शहरांचे तापमान ४० अंशांवर गेले होते. त्याचवेळी गारपीट झाली. आता हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार एप्रिल (April) महिन्यात महाराष्ट्रात गेल्या 62 वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मार्च आणि एप्रिल महिना मिळून २३९ टक्के आधिक पाऊस पडला आहे.
किती झाला पाऊस
एप्रिल महिन्यात यावर्षी राज्यात 46.7 मिलिलिटर पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी 1962 मध्ये एप्रिल महिन्यात 23.4 मिलीमीटर पाऊस झाला होता. त्यानंतर या वर्षीच्या एप्रिलमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद असल्याचे हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. म्हणजेच यंदाच्या एप्रिल महिन्यात गेल्या 62 वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
सर्वाधिक उष्ण महिनाही
एकीकडे एप्रिल महिन्यात 46.7 मिलिलिटर पावसाची नोंद झाली. परंतु ऊनही चांगले तापले होते. अनेक शहरांनी तापमानाची चाळीशी पार केली होती. यामुळे एप्रिल महिना गेल्या 10 वर्षात सर्वाधिक उष्ण आणि सर्वाधिक थंड देखील राहिला आहे. या महिन्यात सर्वाधिक 44.4 अंश किमान तापमानाची नोंद झाली.
राज्यात शुक्रवारी सर्वाधिक तापमानाची नोंद सोलापूरमध्ये ३७.६ अंश सेल्सियस झाली. पुणे व मुंबईचे तापमान ३५ अंशाच्या खाली होती. पुणे शहराचे तापमान ३४.४ तर मुंबईचे तापमान ३२ अंश सेल्सियस होते.
तापमान कसे असणार
राज्यात ५ ते ११ मे दरम्यान तापमान वाढीतून दिलासा मिळणार आहे. या काळात तापमान ४० अंशाच्या आत असणार आहे. परंतु त्यानंतर १२ ते १८ मे दरम्यान तापमानात वाढ होणार आहे. राज्यात सर्वाधिक तापमान सोलापूरचे नोंदवले गेले. सोलापूरमध्ये ३६.६ अंश तापमान होते तर मुंबईत ३३.२ अंश तापमान होते. पुण्याचे तापमानही ३३.९ अंशांवर होते.