बालविवाह झाल्यास सरपंच, ग्रामसेवक, तलाठयांचे पद रद्द करा ; राज्य महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

| Updated on: Nov 13, 2021 | 12:14 PM

महाराष्ट्रात ज्या ठिकाणी बालविवाह झाल्याचं निदर्शनास आल्यास तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी जसं की सरपंच तत्सम प्रतिनिधी आणि विवाह नोंदणी अधिकारी जसं की, ग्रामसेवक, तलाठी किंवा तत्सम अधिकारी यांची जबाबदारी निश्चित कारावी. त्यानंतर अश्या प्रकारची घटना घडली व त्याची दोष सिद्धी झाल्यास त्यांचे पद रद्द करण्यात यावं. ही दुरुस्ती बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ मध्ये करावी.

बालविवाह झाल्यास सरपंच, ग्रामसेवक, तलाठयांचे पद रद्द करा ; राज्य महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
रुपाली चाकणकर
Follow us on

पुणे- राज्यात कोरोनाकाळात बालविवाहाचं (child marriage) प्रमाण वाढलं आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी राज्य महिला आयोग सक्रिय झाले आहे. यासाठी राज्य महिला आयोगानं (State Women Commission) एका नवीन नियम लागू करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडं पत्र लिहून केली आहे. आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून नवीन नियम लागू करण्याची मागणी केली आहे.

बाल विवाहाची सद्यस्थिती पाहता सदरचे या नवीन नियमानुसार महाराष्ट्रातील  बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ज्या ठिकाणी बालविवाह झाल्याचं निदर्शनास आल्यास तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी जसं की सरपंच तत्सम प्रतिनिधी आणि विवाह नोंदणी अधिकारी जसं की, ग्रामसेवक, तलाठी किंवा तत्सम अधिकारी यांची जबाबदारी निश्चित कारावी. त्यानंतर अश्या प्रकारची घटना घडली व त्याची दोष सिद्धी झाल्यास त्यांचे पद रद्द करण्यात यावं. ही दुरुस्ती बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मध्ये करावी. बालविवाह झाल्याचे सिद्ध झाल्यास त्यांचं पद रद्द करण्यात यावे अशी शिफारस राज्य महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून करत असल्याचे पत्र रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

या जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण अधिक
राज्य मागील दोन वर्षात एकूण 914 बालविवाहच्या घटना रोखण्यात आल्या आहेत. सर्वाधिक बालविवाहप्रमाण बीड, औरंगाबाद, अहमदनगर, परभणी, सोलापूर , जालना, बुलढाणा जिल्ह्यांत आहे. यातील 81  घटनांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. परंतु ही आकडेवारी नोंद झालेली आकडेवारी आहे. ज्याची नोंदचा झाली नाही अशी आकडेवारी मोठी आहे. वयाच्या 14-15 व्या वर्षीचा बाळ विवाह केला जातो. विवाहानंतर एका वर्षातच संबंधित अल्पवयीन मुलावर बाळंतपण लादलं जात. अनेकदा या बाळंतपणात माते व बालकाचा मृत्यू होण्याचं प्रमाणही वाढले आहे. यावर आळा घालणे आवश्यक आहे.

सद्यस्थितीला शिक्षेची ही तरतूद आहे.
बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 कायद्यानुसार मुलीचं लग्न लावून देणारे कुटुंब , भटजी, फोटोग्राफर, मंगल कार्यालय मालक यांच्यावर कारवाई करण्यात येते. आता त्यामध्ये या नवीन नियमाची भर टाकण्यात येणार आहे.

 

हेही वाचा

VIDEO: तोंडाला रुमालरझा अकादमी हे भाजपचं पिल्लू, त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याचे काय कारण? संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा,

हातात काठ्या, शेकडो तरुण रस्त्यावर; अमरावतीत जमावाकडून प्रचंड दगडफेक

मालेगाव भीषण शांत, माथेफिरूंनी तीन पोलीस अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याचे समोर, संशयितांची धरपकड