चंद्रपूरः शहरात वाहन चोरीच्या गुन्ह्यात राष्ट्रवादी युवती प्रमुख कार्यकर्तीला (Chandrapur Theft)अटक करण्यात आली आहे. वाहन चोरीसाठी ही युवती दोन साथीदारांच्या मदतीने विशिष्ट पद्धत वापरत असे. गर्दीच्या ठिकाणाहून ही विशिष्ट पद्धत वापरून या युवतीने मित्रांच्या सोबत अनेक गाड्या पळवल्याचे उघड झाले. दरम्यान, चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (Chandpur police) पथकाने मोठ्या शिताफीने या तिघांचे कृत्य पकडले असून या प्रकरणी राष्ट्रवादी युवती कार्यकर्ती वैष्णवी देवतळे सह मनीष पाल आणि सौरभ चंदनखेडे अशा तीन आरोपींना कोठडी देण्यात आली आहे.
चंद्रपूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी चोरण्यासाठी या तिघांनी विशिष्ट प्रकारची मोडस ऑपरेंडी वापरली होती. वैष्णवी देवतळे नावाची ही युवती आणि तिचे दोन साथीदार गर्दीच्या ठिकाणी लॉक नसलेल्या मोपेड गाड्या हेरत असत. ही युवती अशा गाड्यांवर बसून दूरपर्यंत ती ढकलत नेस असे. त्यानंतर साथीदारांच्या मदतीने गाडी निर्जनस्थळी नेत असत. मेकॅनिक साथीदारांच्या मदतीने गाडी सुरु करून तिची विक्री केली जात असे.
चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत युवतीसह इतर दोन साथीदारांनी चोरलेली 11 वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी सध्या या तिघांना कोठडीत ठेवले असून त्यांच्याकडून अन्य काही ठिकाणचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या-