कोल्हापूरः होळी सणाच्या आधी गेल्या दहा दिवसांपासून विविध मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून धरणग्रस्तांनी बेमुदत ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील धरणग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या मागण्यांसाठी एल्गार पुकारला आहे. गेल्या दहा दिवसापासून श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली हे बेमुदत आंदोलन सुरूच केले. आज आंदोलनाचा दहावा दिवस असून जणू या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संसार थाटला आहे.
धरणग्रस्तांचे 100 टक्के पुनर्वसन करावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्या घेऊन या आंदोलकांनी सण उत्सवही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारातच करण्यास सुरुवात केली आहे.
यावेळी आंदोलकांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसरही दणाणून सोडलाय आहे.
या आंदोलकांनी निर्वाणीचा इशारा राज्य सरकारला दिला असून कोणत्याही परिस्थितीत मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचंही त्यांनी सांगितले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयसमोर धरणग्रस्तांनी गेल्या दहा दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने धरणग्रस्तांनी आता शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुषांनीही सहभाग दर्शवला असून आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही असा इशाराही त्यानी यावेळी दिला आहे.
होळीचा सण असूनही प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे आम्हाला आंदोलनस्थळीच होळी साजरी करावी लागली आहे. प्रकल्पग्रस्तांनी आपली घरेदारे, जमिनी राज्याच्या विकासासाठी दिली आहेत.
मात्र प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे सण उत्सवही जिल्हाधिकारी कार्यालयातच साजरी करावी करण्याची वेळ आली आहे अशी टीकाही त्यांनी धरणग्रस्तांनी केली आहे.
प्रशासनाकडून धरणग्रस्तांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने शासनाच्या विरोधातही त्यांनी होळी साजरी केली आहे. यावेळी शासनाच्या विरोधात शंखध्वनी करुन सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालू असलेल्या धरणग्रस्तांच्या आंदोलनामध्ये महिलांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. यावेळी महिलांनीही सरकार आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या आहेत.