काही पक्षाच्या चेहऱ्यावर शिवाजी महाराजांचा फोटो आणी हृदयात औरंगजेबाचे विचार – भाजपा नेत्याचं मोठं विधान

| Updated on: May 18, 2023 | 2:22 PM

"आमचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल? याचं उत्तर केंद्रीय नेतृत्व देऊ शकतं. केंद्रीय नेतृत्व योग्य वेळी, योग्य निर्णय घेईल" असंही या नेत्याने सांगितलं.

काही पक्षाच्या चेहऱ्यावर शिवाजी महाराजांचा फोटो आणी हृदयात  औरंगजेबाचे विचार - भाजपा नेत्याचं मोठं विधान
BJP
Follow us on

निखिल चव्हाण, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी

मुंबई : “काही ठिकाणी दंगली भडकवण्याचा प्रयत्न होतोय, अशी गृह विभागाकडे माहिती आहे. पुण्यात मागे एका राजकीय पक्षाच्या नेत्याने, जेव्हा त्याचं कॉल रेकॉर्डीग समोर आलं, त्यात त्यांनी पुण्यात दंगली भडकवा अस सांगितलं होतं. असे काही राजकीय पक्ष आहेत, त्याचं नाव मी घेणार नाही. गृहविभाग तपास करेल. असे राजकीय पक्ष दंगली भडकवून चांगल्या कामातून सत्तेत यावं, या भावनेतून काम करत नाहीत. धर्म, जातीत द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात” अशी टीका राज्याते सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

“नितेश राणे आणि संजय राऊत यांची आम्ही जोडी केलीय. नितेश राणेंना संजय राऊतांनी उत्तर द्यावं. नितेश त्यांना योग्य पद्धतीने पूर्ण माहिती देईल. जशा पद्धतीचा प्रश्न तशीच उत्तर मिळणार” असं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.

राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर कोण निर्णय घेणार ते सांगितलं?

“आमचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल? याचं उत्तर केंद्रीय नेतृत्व देऊ शकतं. केंद्रीय नेतृत्व योग्य वेळी, योग्य निर्णय घेईल. भाजपा आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत. आम्ही नेहमी काम करत असतो. ऑक्टोंबरचा कशाला? आम्ही आताही निवडणुकीसाठी तयार आहोत” असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.

‘बहुमत सिद्ध करायचं होतं, का पळून गेले?’

सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे आणि संजय. राऊतांवर घणाघाती टीका केली. “हिंमत होती, तर बहुमत सिद्ध करायचं होतं, का पळून गेले? पळपुटेपणा केला, 30 ला बहुमत सिध्द करा म्हटलं, तर 29 ला पळून गेले” अशी बोचरी टीका मुनगंटीवारांनी केली. “काही पक्षांच्या चेहऱ्यावर शिवाजी महाराजांचा फोटो आणी ह्दयात औरंगजेबाचे विचार आहेत” अशी घणाघाती टीका मुनगंटीवार यांनी केली.

“उद्धव ठाकरेंना 40 माणसं टिकवता आली नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. भाजपा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन कार्यकारिणी बनवत नाही” असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.