नाशिक : नाशिक इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे असलेल्या जिंदाल कंपनीला भीषण आग लागली होती. या आगीत तिघांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. आगीची तीव्रता इतकी होती की कितीतरी किलोमीटर वरुन आगीचे लोळ दिसून येत होते. यासाठी नाशिक महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले होते. तब्बल अकरा दिवस जिंदाल कंपनीत अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी काम करत होते. नाशिक महानगर पालिकेने याबाबत सेवाशुल्कच्या देयकाचे पत्र जिंदाल कंपनीला पाठविले आहे. अग्निशमन दलाच्या व्यवस्थापनाकडे सेवाशुल्काची रक्कम ही 5.86 लाख रुपये नमूद केली आहे. महापालिकेने केलेलया मागणीबाबत जिंदाल कंपनी सेवाशुल्काचे बिल दिले जाते की नाही याकडे पालिकेचे लक्ष लागून आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी लागलेल्या आगीची घटना संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली होती. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिंदाल कंपनीला भेट दिली होती.
नाशिक जिल्ह्यातील मुंढेगाव येथे असलेल्या जिंदाल कंपनीला सेवा शुल्क म्हणून नाशिक महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाने जवळपास सहा लाख रुपयांचे देयक पाठविले आहे.
जिंदाल कंपनीच्या अग्निशमन दलाच्या व्यवस्थापनाला पालिकेने केलेल्या सेवाशुल्काच्या मागणीला जिंदाल कंपणी कसा प्रतिसाद देते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील आगीच्या घटणेपैकी सर्वात मोठी आग असल्याची माहिती समोर आली होती. नाशिक महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाला तब्बल 11 दिवस लागले होते.
केमिकल असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते, आगीचे लोळ कितीतरी किलोमीटर अंतरावरून दिसत होते, त्यासाठी पाण्याबरोबरच अग्निशमन दलाला फोमचा वापर करावा लागला होता.
अग्निशमन दलाने खर्चापोटीचे विवरण देखील कंपनीला दिले आहे. जवळपास सहा लाखांचे सेवाशुल्क कंपनीला द्यावे लागणार आहे.
कर्मचारी प्रवास खर्चापोटी देयक, अग्निशमन बंबांचा वापर, अग्निशमन विभागाकडून अहोरात्र कार्यरत, अद्ययावत अग्निशमन शिडी, अग्निशमन दलाचा मुक्काम आणि ब्राऊजरचा समावेश असल्याचे देयकात नमूद केले आहे.