संदीपान भुमरेंची कमाल, ‘या’ गावात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप एकत्र; तरीही शिवसेनेचे तिघे बिनविरोध; पुढे काय?

| Updated on: Jan 15, 2021 | 7:51 PM

रोजगार हमी विभागाचे मंत्री संदीपान भुमरे यांनी पाचोड येथील 17 पैकी 3 सदस्यांची बिनविरोध निवड करण्याची कमाल केली आहे. (Pachod gram panchayat election)

संदीपान भुमरेंची कमाल, या गावात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप एकत्र; तरीही शिवसेनेचे तिघे बिनविरोध; पुढे काय?
Follow us on

 

औरंगाबाद : राज्यात अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका (gram panchayat election) होत आहेत. मात्र, या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपैकी औरंगाबादमधील पाचोडची निवडणूक (Pachod gram panchayat election) चांगलीच चर्चेत आली आहे. रोजगार हमी विभागाचे मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी पाचोड येथील 17 पैकी 3 सदस्यांची बिनविरोध निवड करण्याची कमाल केली आहे. येथे आता 17 पैकी फक्त 14 जागांसाठीच निवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेचा हात सोडून भाजपशी आघाडी करुनही शिवसेनेचे मंत्री भुमरे यांनी हा धमाका घडवून आणल्यामुळे पाचोड ग्रामपंचायत निवडणुकीची चांगलीच चर्चा होत आहे.

आघाडीला नमवत तिघे बिनविरोध

राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमुळे गावपातळीवरचं राजकारण चांगलंच तापलं आहे. वेगवेगळे डावपेच आखून आपल्याच उमेदवाराच्या डोक्यावर विजयी मुकूट असावा यासाठी सर्व पक्ष प्रयत्न करत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे अनेक गावांत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढत आहेत. मात्र जिल्ह्यातील पाचोड ग्रामपंच्यातीमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग मोडीत निघाला असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपचा हात धरला आहे. येथे शिवसेना पक्ष एकटा निवडणूक लढवत आहे. त्याला काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी या तिघांनी मिळून तगडं आव्हान उभं केलं आहे. मात्र, असं असलंतरी भुमरे यांनी येथील राजकारणात लक्ष घालून येथील 17 पैकी 3 जागांवर बिनविरोध निवड घडवून आणली आहे. येथे यानंतर फक्त 14 जागांवर लढती होतील.

भुमरे यांच्याविरोधात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना

पाचोड येथील ग्रामपंचातीची निवडणूक अतिशय अटीतटीची होणार असल्याचं म्हटलं जातंय. शिवसेना नेते मंत्री संदीपान भुमरे यांनीसुद्धा येथील निवडणुकीत लक्ष घातलं आहे. त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व आले आहे. भुमरे यांनी लक्ष घातल्यामुळे त्यांचे आव्हान परतवून लावण्यासाठी भुमरे यांच्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप या तीन पक्षांनी आघीडी केली आहे. असे असतानासुद्धा भुमरे यांनी या तिन्ही पक्षांच्या आघाडीला नमवत 3 जागा बिनविरोध काढल्या आहेत. तसेच त्यांनी राहिलेल्या 14 जागा जिंकून येथील ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी मोर्चेबांधणी केल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, भुमरे यांनी आपले तीन उमेदवार बिनविरोध निवडून आणले असले तरी येथे अजून 14 जागांवर निवडणूक होणार आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस येथे एकत्र आल्यामुळे शिवसेनेपुढे त्यांचे तगडे आव्हान असेल.

संबंधित बातम्या :

कोल्हापूर महापालिका निवडणूक भाजप ताकदीनिशी लढणार; चंद्रकांत पाटलांची घोषणा

सिद्धिविनायक दर्शनावेळी राज ठाकरेंचा ‘मसल मॅन’ सोबतीला, कंगनाला मनसेचा छुपा पाठिंबा?

जिथे ताकद तिथे स्वबळ वापरु, राष्ट्रवादीची पहिल्यांदाच जाहीर भूमिका