Phulambri Vidhansabha Constituency: छत्रपती संभाजीनगर मतदार संघातील फुलंब्री हा मतदार संघ भाजपचा गड आहे. गेल्या दोन पंचवार्षिकमध्ये या ठिकाणी भाजप उमेदवार निवडून आला. हरिभाऊ बागडे हे आमदार झाले. त्यांना राज्यपाल म्हणून राजस्थानमध्ये पाठवले. त्यानंतर या मतदार संघात भाजपला दुसरा उमेदवार शोधावा लागला. भाजपने अनुराधा चव्हाण यांना तिकीट दिले. त्यांच्या विरोधात काँग्रेसने विलास केशवराव औताडे यांना मैदानात उतरवले आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री मतदारसंघात भाजपने अनुराधा चव्हाण यांना तिकीट दिले आहे. परंतु त्यांच्या उमेदवारीला महायुतीमधून विरोध होत आहे. शिवसेना जिल्हाध्यक्ष रमेश पवार यांनी बंडखोरी करण्याचा इशारा दिला आहे. ते अपक्ष लढण्याच्या तयारीत आहे. खरंतर फुलंब्री मतदारसंघ भाजपचा आहे. 2014 आणि 2019 मध्ये इथून भाजपचे हरिभाऊ बागडे आमदार होते. त्यापूर्वी काँग्रेसचे कल्याण वैजनाथराव काळे या ठिकाणी आमदार होते. काँग्रेसने या ठिकाणी विलास केशवराव औताडे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसमध्येही फुलंब्री विधानसभा मतदार संघाबाबत प्रचंड उत्सुकता होती. कारण खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचे बंधू तिकिटासाठी इच्छूक होते. जगन्नाथ काळे तसेच पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. मोहन देशमुख यांनीही तिकीट हवे होते. परंतु विलास औताडे यांनी बाजी मारली.
फुलंब्री विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये भाजपचे हरिभाऊ बागडे यांना 1,06,190 मते मिळाली होती. त्यांच्या विरोधात असलेले काँग्रेसचे डॉ. कल्याण वैजिनाथराव काळे हे पराभूत झाले होते. 15,274 मतांनी हरिभाऊ बागडे यांनी विजय मिळवला होता.
वर्ष |
आमदार
|
पक्ष | |
२०१९ | हरिभाऊ किसनराव बागडे | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | हरिभाऊ किसनराव बागडे | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | कल्याण वैजनाथराव काळे |
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
|
फुलंब्री विधानसभा मतदारसंघात जातीय गणिताला महत्व आहे. या ठिकाणी २०११ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीचे ६३,२०३ मतदार आहेत. तर अनुसूचित जमातीचे ६,२११ मतदार आहेत. मुस्लिम मतदार 37,198 आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत फुलंबारी विधानसभेत एकूण 68.67 टक्के मतदान झाले होते.
फुलंब्री या मतदारसंघात भाजप नेते हरिभाऊ बागडे यांनी पक्ष मजबूत केला होता. कोणत्या गावात कोणते कार्यकर्ता आहेत, त्याची माहिती त्यांना होती. पक्षातील कच्चे दुवे त्यांना माहीत होते. त्यांचा जनसंपर्क चांगला होता. आमदार म्हणून काम करताना त्यांनी गावागावात लघू पाटबंधारे बांधले. यामुळे आता त्यांच्या अनुपस्थितीत हा मतदार संघ टिकवण्याची जबाबदारी अनुराधा चव्हाण यांच्यावर आली आहे.