Indian bison : माजगाव-मेटवाडा परिसरात एक कठडा नसलेल्या विहिरीत पडली गव्याची दोन पिल्ली, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने काढले सुखरूप विहिरी बाहेर

| Updated on: May 16, 2022 | 6:47 PM

विहिरीतून बाहेर काढण्यात आल्यानंतर दोन्ही पिल्लांना सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

Indian bison : माजगाव-मेटवाडा परिसरात एक कठडा नसलेल्या विहिरीत पडली गव्याची दोन पिल्ली, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने काढले सुखरूप विहिरी बाहेर
गव्याची पिल्ले
Image Credit source: tv9
Follow us on

सावंतवाडी : माजगाव (Mazgaon) परिसरात गव्यांचा वावर असून दिवसा ढवळ्या गव्यांचे दर्शन येथे होत असते. तर या परिसरात फिरत असताना विहिरीचा अंदाज न आल्यामुळे गव्याची दोन पिल्ले (Indian bison) पाण्यात पडल्याची विचित्र घटना समोर आली आहे. ही घटना शहरालगत असलेल्या माजगाव-मेटवाडा परिसरातील येथे घडली. हा प्रकार आज सोमवार सकाळी गावकाऱ्यांच्या निर्शनास आला. त्यानंतर येथे बघ्यांची एकच गर्दी झाली. तर याप्रकरणी वनविभागाला (Forest Department) देखील माहिती देण्यात आली होती. यानंतर या दोन्ही पिलांना शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप विहिरी बाहेर काढण्यात यश आले. असून त्यांना जंगलात सोडण्यात आले. यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने हे मदतकार्य पार्य पडले.

याबाबत मिळीलेली माहीती अशी की, माजगाव येथील भाईसाहेब सावंत समाधी परिसरात गेले अनेक दिवसांपासून गव्यांचा वावर असल्याचे दिसत आहे. नरेंद्र डोंगर परिसरात गव्यांचा वावर हा असतोच. तर माजगाव-मेटवाडा परिसरात एक कठडा नसलेली विहिर आहे. दरम्यान या विहिरीचा अंदाज न आल्यामुळे गव्याची दोन पिल्ले विहिरीत पडली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी गव्याची पिल्ले बघण्यासाठी गर्दी केली होती. ही विहीर 40 फूट खोल असून हा प्रकार आज, सोमवारी सकाळी उघडकीस आला. तर याची माहिती वन वन विभागाला देण्यात आली होती. ज्यानंतर वन विभागाचे अधिकारी तेथे पोहचले होते. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने त्या दोन्ही पिल्लांना विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. तर विहिरीतून बाहेर काढण्यात आल्यानंतर दोन्ही पिल्लांना सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.