बांधकामासाठी आवश्यक कच्च्या मालाच्या दरामध्ये भरमसाठ वाढ; विकासकांचे नुकसान, किमती नियंत्रणात आणण्याची मागणी

| Updated on: Nov 21, 2021 | 7:41 AM

भविष्यात घरांच्या किमती वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. घर बांधण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लोखंड, सिमेंट, वाळू अशा सर्वच कच्च्या मालाचे भाव वाढले आहेत.

बांधकामासाठी आवश्यक कच्च्या मालाच्या दरामध्ये भरमसाठ वाढ; विकासकांचे नुकसान, किमती नियंत्रणात आणण्याची मागणी
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : भविष्यात घरांच्या किमती वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. घर बांधण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लोखंड, सिमेंट, वाळू अशा सर्वच कच्च्या मालाचे भाव वाढले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात घरांच्या किमतीमध्ये होणारी वाढ अटळ असल्याचे विकासकांनी म्हटले आहे. विशेष: गेल्या काही महिन्यांमध्ये कच्च्या मालाच्या भावामध्ये मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. कच्च्या मालाचे भाव वाढल्याने त्याचा फटका विकासकांसोबतच ग्राहकांना देखील बसत आहे.

घरांच्या विक्रीमध्ये वाढ 

गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे सावट होते, कोरोनामुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प होते. उद्योग बंद असल्याने अनेकांनी आपला रोजगार देखील गमावला होता. त्यामुळे बाजारात चलनाचा तुटवडा होता. मात्र आता कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे, तसेच लसीकरणाला देखील वेग आला आहे. परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने सर्व उद्योगधंदे पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झाले आहेत. रोजगारामध्ये देखील वाढ झाली आहे. पुन्हा एकदा बाजारात पैसा आल्याने ग्राहकांनी पैसे गुंतवण्यास सुरुवात केली आहे. याचाच परिणाम म्हणजे मुद्रांक शुल्कात सवलत नसतानाही यंदा गेल्या दोन महिन्यांत विशेषत: दिवाळीत घर विक्रीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.

कच्च्या मालाची किमंती कमी करण्याची विनंती

दरम्यान जरी घरांची विक्री वाढली असली, तरी देखील कच्च्या मालाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्याचा फटका हा विकासकांना बसत आहेत. कोरोनापूर्वी अनेक बांधकाम प्रकल्पांना सुरुवात करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत प्रकल्पाचे काम रखडले. आता कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर हे अर्धवट प्रकल्प पूर्ण करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र या काळात कच्च्या मालाच्या किमतीमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याने त्याचा फटका हा विकासकांना बसला आहे. ‘एमसीएचआय-क्रेडाईने’ याकडे सरकारचे लक्ष वेधत कच्च्या मालाच्या किमती कमी करण्याची विनंती केली आहे. त्यासाठी जीएसटीमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात यावी असा उपाय देखील सूचवण्यात आला आहे.

 

संबंधित बातम्या 

एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा डाव; हरिभाऊ राठोड यांचा गंभीर आरोप

शिवसेनेचा महापालिकेत 100 कोटींचा ट्रेंचिंग घोटाळा, भाजप आमदार कोटेचा यांची चौकशीची मागणी

आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलं नाही, कट कारस्थानही रचलं नाही: हायकोर्ट