लातूर : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग व सिद्धिविनायक प्रतिष्ठान, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या ऑटिजम सेंटरचे (स्वमग्नता उपचार व पुनर्वसन केंद्र) चे उद्घाटन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आलं. स्वमग्नता व तत्सम आजारांवर योग्य निदान व उपचार करून अशा बालकांचे पुनर्वसन मोफत करणारे हे देशातील पहिले सेंटर असून, हे सेंटर अत्यानुधिक सोयी सुविधांनी युक्त आहे. यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे, आमदार बाबासाहेब पाटील उपस्थित होते. (India’s first Free Autism Center and Sensory Park in Latur)
जयंत पाटील यांनी या कार्यक्रमात बोलताना सामाजिक न्याय विभागाची धुरा विकासाभिमुख व्यक्तीच्या हाती असल्याचा आनंद हे केंद्र पाहिल्यानंतर होतो आहे, अशा शब्दात सामाजिक न्याय विभागाच्या या अभिनव व नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केलं. स्वमग्नता, बहुविकलांगता, अतिचंचलपणा यांसारखे आजार कायमस्वरुपी नाहीत. त्यांचे वेळीच निदान करुन योग्य उपचार घेतल्यास त्यावर सहज मात करता येऊ शकते. त्यामुळे संबंधित बालक सामान्य जीवन व्यतीत करू शकते, हा विचार करत लातूरच्या धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक ऑटिजम सेंटर उभारण्याचे ध्येय सामाजिक धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केलं. त्याचबरोबर समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, सिद्धिविनायक प्रतिष्ठान यासह हे सेंटर उभारणीसाठी योगदान दिलेल्या सर्वांच मुंडे यांनी कौतुक केलं.
लातूर जिल्हा परिषद व सिद्धीविनायक प्रतिष्ठान संचलित उमंग इन्स्टिट्यूट ऑफ ऑटीझम अँड मल्टीडिसॅबीलीटी रिसर्च सेंटरचे उद्घाटन केले. यावेळी लातूरचे पालकमंत्री@AmitV_Deshmukh, सामाजिक न्याय मंत्री@dhananjay_munde, राज्यमंत्री@BansodeSpeaks, लातूरचे जिल्हाधिकारी, मान्यवर उपस्थित होते. pic.twitter.com/1UZJzfHcaW
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 25, 2021
जिल्हा समाज कल्याण विभागाने जवळपास 1 कोटी रुपये जिल्हा परिषद दिव्यांग निधीतून खर्च करून एका पडक्या शाळेचे नंदनवन केले आहे. या प्रकल्पात केरळ राज्यातील त्रिचुरा येथील सेन्सरी पार्कच्या धर्तीवर या आजाराने ग्रस्त बालकांवर उपचारासाठी उपयुक्त असणारा सेन्सरी पार्क उभारला आहे.
या आस्थापनेत ऑटिजम अर्थात स्वमग्नता, बहुविकलांगता, सेलेवर पल्स, बुध्यांक मापन, अति चंचलपणा, या सारख्या दिव्यांगत्वावर उपचार करण्यासाठी तसेच अस्थिव्यंग असलेल्या बालकाना थेरपी देण्यासाठी सर्व अद्ययावत उपकरणे व तज्ञ व्यक्ती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उद्घाटन होण्यापूर्वीच इथे वेगवेगळ्या आजारांची 500 मुले दाखल आहेत. त्यातील काही मुले योग्य उपचार घेऊन पूर्ण बरे होऊन घरी देखील गेले असल्याची माहिती सीईओ अभिनव गोयल यांनी दिली.
दरम्यान राज्यात कोरोनाच्या संकटामुळे लहान मुलांची शाळा बंद आहे. स्वमग्नता तसेच मोबाईलच्या अतिरेकामुळे अन्य मानसिक आजारांना बळी पडत आहेत, अशा परिस्थितीत हा प्रकल्प पथदर्शी असून, संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा प्रयोग करण्याचा मानस धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
विशेष म्हणजे उद्घाटन होण्याआधीच या सेंटर मध्ये 500 बालके दाखल आहेत.असे उपचार,पुनर्वसन केंद्र राज्यातील सर्व जिल्ह्यात उभारण्याचा मानस आहे.कोरोनामुळे शाळा बंद असल्याने लहान बालकांमध्ये विविध मानसिक आजार उद्भवत आहेत अशा परिस्थितीत लातूर समाज कल्याण विभागाचा हा प्रकल्प पथदर्शी आहे.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 25, 2021
इतर बातम्या :
मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, ‘या’ कामासाठी बेस्टची WHO कडून दखल
India’s first Free Autism Center and Sensory Park in Latur