जालन्यात दर पंधरा दिवसांनी कामगारांची कोरोना चाचणी होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

| Updated on: Mar 31, 2021 | 8:17 PM

जालन्याचा आर्थिक कणा असलेल्या कामगारांना कोरोनाच्या संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. (industrial workers should corona test every 15 days, says ravindra binwade)

जालन्यात दर पंधरा दिवसांनी कामगारांची कोरोना चाचणी होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
ravindra binwade
Follow us on

जालना: जालन्याचा आर्थिक कणा असलेल्या कामगारांना कोरोनाच्या संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व कामगारांची दर पंधरा दिवसाने सक्तीने कोरोना चाचणी करण्याचे आदेशच रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत. (industrial workers should corona test every 15 days, says ravindra binwade)

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज जिल्ह्यातील व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कडले, व्यापारी महासंघाचे घनश्याम गोयल, अशोक राठी, अविनाश देशपांडे, प्रज्ञेश केनिया आदी उपस्थित होते.

कामगारांना लसीकरणासाठी घेऊन या

जालना येथे मोठी औद्योगिक वसाहत असून हजारो कामगार या ठिकाणी काम करतात. त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या प्रत्येक कामागारांची दर पंधरा दिवसाला कोरोना चाचणी अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर आता 1 एप्रिलपासुन 45 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला लस घेता येणार असल्याने 45 वर्षावरील कामागारांसाठी प्रशासनामार्फत मोफत लस उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कोरोना चाचणी तसेच लसीकरणासाठी प्रशासनामार्फत टीम्स गठीत केल्या असून 1 एप्रिल पासून चाचणी तसेच लसीकरण या टीम्सच्या माध्यमातून सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व आस्थापनांनी कामगारांना चाचणी व लसीकरणासाठी ठरविण्यात आलेल्या केंद्रावर घेऊन घेऊन यावे असं आवाहन बिनवडे यांनी केलं. जिल्ह्याच्या तुलनेत जालना शहरामध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाला रोखण्यासाठी ट्रॅकींग व टेस्टींगबरोबरच लसीकरणही महत्वाचे आहे, असंही त्यांनी सांगितलं.

45 वर्षावरील प्रत्येकाने लस घ्यावी

कंपनीचे उत्पादन हे कामगारांवर अवलंबून असते. कामगार स्वस्थ राहिला तरच कंपनीला अपेक्षित उत्पादन घेता येणे शक्य आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांबरोबरच औद्योगिक वसाहतीवरही मोठ्या स्वरुपात परिणाम होतो. प्रत्येक कामगाराने कोरोना चाचणी करुन घेण्याबरोबरच 45 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीने लस टोचून घेण्याचे आवाहनही त्यांनी केलं.

व्यापारी महासंघाने भार उचलावा

जालन्यामध्ये कोव्हीशिल्ड व कोव्हॅक्सिन अशा दोन लस उपलब्ध असून खासगी दवाखान्यांमध्ये प्रत्येक डोससाठी 250 रुपये तर शासकीय रुग्णालयात मोफत स्वरुपात लस उपलब्ध करुन देण्यात येत आहे. खासगी दवाखान्यामध्ये फिस आकारणी केली जात असल्याने त्यांच्याकडे असलेल्या लस पडून आहेत. खासगी दवाखान्यात असलेल्या लसीचा उपयोग कामगांराना टोचण्यासाठी करण्यात येऊन त्यापोटी येणारा खर्च व्यापारी महासंघाने उचलण्याचे आवाहनही त्यांनी केले. (industrial workers should corona test every 15 days, says ravindra binwade)

 

संबंधित बातम्या:

लॉकडाऊन रद्द केल्यानंतरचा जल्लोष भोवला, खासदार इम्जियाज जलिल यांच्यावर गुन्हा दाखल

जालन्यात कोरोना रोखण्यासाठी ‘अ‍ॅक्शन’ प्लान; आरोग्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ सूचना

जालन्यात कामगारांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणार; आरोग्यमंत्री लागले कामाला

(industrial workers should corona test every 15 days, says ravindra binwade)