नाशिक : नाशिकमध्ये गिरीश कुबेरांवर शाईफेक झाल्यानंतर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. भाजच्या काही नेत्यांनी याचं समर्थन केलं आहे तर काही नेत्यांनी शाईफेकीचा प्रकार अयोग्य असल्याचं म्हटलं आहे, पण महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखानाचाही निषेध असं फडणवीस म्हणालेत. तर इतर राजकीय पक्षांकडूनही यावर जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हा वाद सुरू होण्यामागचं कारण काय होतं? गिरीश कुबेरांनी नेमकं काय लिहलं होतं? याचाही शोध आम्ही घेतला आहे.
कुबेरांनी लिलेला वादग्रस्त मजकूर
गिरीश कुबेर लिहतात, ”छत्रपती संभाजी महाराजांनी सोयराबाईंची हत्या केली, तसेच ”छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई यांच्याशी निष्ठा असणाऱ्यांनाही ठार केले, त्यातील काहीजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मडळातील होते, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेली चांगली फळी नष्ट झाली. याची किंमत नंतर छत्रपती संभाजी महाराजांना मोजावी लागली” असंही ते लिहतात. या मजकूरावरून कुबेर यांच्यावर टीकेची झोड उडाली होती.
वादग्रस्त लिखानामुळे कुबेर अनेकदा वादात
आपल्या लिखानामुळे वादात येण्याची गिरीश कुबेरांची ही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा लिहलेल्या लेखांमुळे गिरीश कुबेर वादात सापडले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल असं लिहल्यानंतर अनेक मराठा संघटनांनी गिरीश कुबेरांच्या लिखानाचा निषेध नोंदवला होता. भाजपनेही हे लिखान खोडसाळपणाचं असल्याची टीका केली होती. त्यानंतर आज नाशिकच्या साहित्य संमेलनात गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याने हा वाद पुन्दा एकदा पेटला आहे. राजकीय गोटतूनही दोन्ही बाजून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.