भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात एक विधान केले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नड्डा यांनी भाजप आता सक्षम पक्ष झाला असून संघाची गरज नाही, असे म्हटले आहे. त्यानंतर त्या वक्तव्याच्या संदर्भात घेत राजकारणात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. नड्डा यांच्या त्या वक्तव्याच्या अनुषांगाने संघाचे अभ्यास वसंत काणे, यांच्याशी ‘टीव्ही ९ मराठी’ने संवाद साधला.
जे.पी. नड्डा यांच्या वक्तव्यामागे काय भूमिका असणार? ते वसंत काणे यांनी विषद केले. त्यांनी म्हटले की, जे.पी. नड्डा यांनी जे वक्तव्य आहे, ते वक्तव्य कोणत्या संदर्भात आहे, ते पुरेसं स्पष्ट होत नाही. एका वृत्तपत्राला त्यांनी मुलाखत दिली आहे. त्यावेळी कोणता प्रश्न होता, त्या अगोदरचा प्रश्न कोणता होता आणि हा प्रसंग कसा निर्माण झाला, हा मुद्दा स्पष्ट होत नाही. पण एक गोष्ट नक्की आहे जर असे ते म्हणाले असतील तर संघाची ती सगळ्याच क्षेत्राबद्दलची अपेक्षा आहे. शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी नड्डा यांच्या विधानावर टीका करत ते संघाला भाजपपासून धोका असल्याचे म्हटले होते.
संघाच्या प्रेरणेने जेवढे कार्य सुरू आहे, त्या सगळ्यांनी स्वयंपूर्ण व्हावे, स्वत:च्या भरोशावर काम चालू व्हावं, मनुष्यबळ म्हणून किंवा मदत म्हणून कोणावरही आणि संघावरही त्यांनी अवलंबून राहू नये, हेच संघाची अपेक्षा आहे. भाजपच राजकीय क्षेत्र हे मोठे आहे. मतदानाच्या वेळी मनुष्यबळाची आवश्यकता त्यांना भासत असेल. अशा वेळेला काही ठिकाणी भाजपच्या भूमिकेशी सहमत असणारे संघाचे स्वयंसेवकच नाही, तर समाजातील व्यक्तींची सुद्धा त्यांना होत असले, हे बरोबर आहे. या संदर्भाहे वक्तव्ये जे.पी. नड्डाजी यांनी केले असावे, असा माझा समज आहे. मात्र संघाची मूळ अपेक्षा हीच आहे की तुम्ही स्वतःच्या भरोशावर उभे राहा. कोणाच्या भरोशावर अवलंबून राहू नका. भाजपने माझ्या मते ही अवस्था केव्हाच प्राप्त केली आहे, असे आरएसएस अभ्यासक वसंत काणे यांनी म्हटले आहे.
एवढा मोठा राजकीय पक्ष दहा वर्ष सत्तेवर राहतो आणि तो स्वयंपूर्ण नाही, असे होऊ शकत नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काही वर्ष प्रारंभिक ही स्थिती असू शकते. सुरुवातीच्या काळामध्ये बाहेर निघणाऱ्या माणसाला कामासाठी प्रतिष्ठा करावी लागते. ओळख करून द्यावी लागते. त्या दृष्टीने काही सहाय्य संघाचे झाले असणे शक्य आहे. पण त्या व्यतिरिक्त भाजप जर म्हणते आहे तर आता त्यांनी त्यांचा उद्दिष्ट पूर्णपणे गाठलेला आहे. ते कोणावर अवलंबून नाही आणि हेच संघाला सुद्धा अपेक्षित आहे.
मी संघाचा प्रवक्ता नाही. मात्र मला संघाची मूलभूत भूमिका माहीत आहे. त्यानुसार संघाच्या प्रेरणेने जवळजवळ 25-30 विविध संस्था कार्यरत आहे. त्यांनी सुद्धा स्वयंपूर्ण व्हावे, असे संघाकडून सांगितले जात आहे. त्या संस्थांना सुरुवातीला मदत केली जाते. मात्र प्रत्येक क्षेत्र हे स्वयंपूर्ण असावे, हेच संघाची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा या सगळ्या संघटनांनी पूर्ण केली आहे.