भाजप पदाधिकारी- जिल्हाधिकारी स्ट्रँग रुममध्ये फिरताय, भाजपमध्ये राहिलेल्या माजी खासदाराच्या आरोपाने खळबळ

| Updated on: May 28, 2024 | 7:11 AM

माजी खासदार उन्मेष पाटील यांनी स्ट्राँग रूमच्या डिस्प्ले बंद होण्यामागे कारणीभूत संबंधित लोकांवर कारवाईची मागणी केली आहे. आपण यासंदर्भात निवडणूक आयोग तसेच निवडणूक निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली असल्याची माजी खासदार उन्मेष पाटील यांनी म्हटले आहे.

भाजप पदाधिकारी- जिल्हाधिकारी स्ट्रँग रुममध्ये फिरताय, भाजपमध्ये राहिलेल्या माजी खासदाराच्या आरोपाने खळबळ
unmesh patil
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

लोकसभा निवडणुकीचा सर्व टप्पे राज्यात संपले आहेत. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक झाल्यानंतर आता ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लक्ष लागले आहे. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व ईव्हीएम यंत्रणा स्ट्रँग रुममध्ये ठेवण्यात आली आहे. त्याठिकाणी २४ तास सुरक्षा दलाचा बंदोबस्त आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे. दरम्यान जळगाव लोकसभा मतदार संघातील ईव्हीएम वखार महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आले आहे. परंतु त्या ठिकाणाच्या सीसीटीव्ही डिस्प्ले चार मिनिटे बंद झाला होता. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. भाजपमध्ये राहिलेले आणि आता शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेते उन्मेष पाटील यांनी खळबळजनक आरोप केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांसोबत भाजप पदाधिकारी स्ट्रँगरुममध्ये फिरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय झाला होता प्रकार

जळगाव लोकसभा मतदार संघ आणि रावेर लोकसभा मतदार संघासाठी 13 मे रोजी मतदान झाले होते. त्यानंतर दोन्ही लोकसभा मतदार संघातील ईव्हीएम बखार महामंडळाच्या स्ट्राँग रुममध्ये ठेवले आहे. 26 मे रोजी सकाळी 9 वाजेपासून 9.04 मिनिटांपर्यंत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले बंद झाला होता. त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी जिल्हाधिकारींना ही बाब सांगितली. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे जनरेटरवरून इन्व्हर्टरवर वीज पुरवठा स्थलांतरित करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डिस्प्ले बंद झाला, असे जिल्हाधिकारींनी म्हटले होते.

उन्मेष पाटील यांचा खळबळजनक आरोप

जळगावातील मतदानाचे मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूमरूम मधील सीसीटीव्ही फुटेज डिस्प्ले बंदच्या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. शिवसेना ठाकरे गटातील माजी खासदार उन्मेष पाटील यांनी ही माहिती दिली. जनरेटरचा आणि इन्वर्टरचा बॅकअप असताना डिस्प्ले बंद होत असतील तर ही संशयास्पद बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांसोबत भाजपचे पदाधिकारी स्ट्राँग रूममध्ये फिरत असल्याचा आरोप माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केला आहे. त्यांनी जळगाव जिल्हा प्रशासनाच्या कामकाजावर संशय व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

कारवाई करण्याची मागणी

माजी खासदार उन्मेष पाटील यांनी स्ट्राँग रूमच्या डिस्प्ले बंद होण्यामागे कारणीभूत संबंधित लोकांवर कारवाईची मागणी केली आहे. आपण यासंदर्भात निवडणूक आयोग तसेच निवडणूक निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली असल्याची माजी खासदार उन्मेष पाटील यांनी म्हटले आहे. लोकसभेचे मतदान मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूममधील सीसीटीव्हीचे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद असल्याची घटना घडल्यानंतर त्याची चर्चा जळगावात होत आहे.