जळगावात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, व्हिडीओ व्हायरल, नेमका प्रकार काय?

| Updated on: Jul 05, 2024 | 9:59 PM

जळगाव महापालिकेतर्फे अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे जळगाव शहरातील अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम सुरू आहे. यात फळ गल्ली, मसाला गल्ली, छत्रपती शिवाजी नगर, गांधी मार्केट परिसरात कारवाई केली. या कारवाईत अतिक्रमण धारक आणि मनपाचे कर्मचारी यांच्यात चांगलाच वाद झाला.

जळगावात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, व्हिडीओ व्हायरल, नेमका प्रकार काय?
Follow us on

जळगावत अतिक्रमण काढण्याची कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत दमदाटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. अतिक्रमण काढण्याचे कारवाई करत असताना महापालिकेचे कर्मचारी आणि अतिक्रमणधारक यांच्यात वाद होतं. यावेळी ही धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने फळ गल्ली, मसाला गल्ली, छत्रपती शिवाजी नगर, महात्मा गांधी मार्केट परिसरात मोहिम राबवित 13 लोटगाड्या जप्त केल्या आहेत.

जळगाव महापालिकेतर्फे अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे जळगाव शहरातील अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम सुरू आहे. यात फळ गल्ली, मसाला गल्ली, छत्रपती शिवाजी नगर, गांधी मार्केट परिसरात कारवाई केली. या कारवाईत अतिक्रमण धारक आणि मनपाचे कर्मचारी यांच्यात चांगलाच वाद झाला. अतिक्रमण काढण्यात येत असल्याने एका अतिक्रमण धारकाने कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत थेट मारहाण करण्याचा प्रयत्न केला. संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. संबंधित व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे.

अतिक्रमण विरोधातील कारवाई आणखी तीव्र होणार?

जळगाव शहराच्या विविध भागातील अतिक्रमण निर्मूलनाची धडक मोहिम राबविणे सुरू केले आहे. राजकीय दबाब झुगारून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्यासाठी कारवाई केली जात आहे. त्याच अनुषंगाने गुरूवारी अशाच प्रकारची कारवाई सुरु होती. या दरम्यान अतिक्रमण निर्मूलन विभागाने फळ गल्ली, मसाला गल्ली, छत्रपती शिवाजी नगर, महात्मा गांधी मार्केट परिसरात मोहिम राबविली. यात 13 लोटगाड्या जप्त केल्यात. विशेष म्हणजे आगामी काळात ही मोहीम आणखी तीव्र आणि शिस्तीने राबवण्यात येण्यात असल्याची चर्चा आहे.