Jalgaon Rural Assembly Constituency: जळगाव ग्रामीणमध्ये दोन ‘गुलाब’मध्ये काट्यांची टक्कर, कोणाला मिळणार काटे अन् कोणाला फुल?

| Updated on: Oct 25, 2024 | 3:45 PM

Jalgaon Vidhansabha 2024: जळगाव ग्रामीण मतदार संघ एरंडोल विधानसभा मतदासंघातून 2009 मध्ये वेगळा करण्यात आला. त्यात धरणगाव तालुका आणि जळगाव तालुक्यातील गावांचा समावेश केला गेला. ग्रामीण मतदार संघ असलेल्या या भागावर शिवसेनेचा दबदबा राहिला आहे.

Jalgaon Rural Assembly Constituency: जळगाव ग्रामीणमध्ये दोन गुलाबमध्ये काट्यांची टक्कर, कोणाला मिळणार काटे अन् कोणाला फुल?
jalgaon rural assembly constituency
Follow us on

Jalgaon Vidhansabha 2024 : जळगाव जिल्हा भाजप आणि शिवसेनेचा गड राहिला आहे. जिल्ह्यातून भाजप-शिवसेनेला जसे यश मिळाले तसे जिल्ह्यांतील अनेकांना मंत्रीपद मिळाले. एकनाथ खडसे, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गुलाबराव देवकर, अनिल पाटील, डॉ.सतीश पाटील हे गेल्या पंधरा-वीस वर्षांत मंत्री झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील लक्षवेधी लढतीत जळगाव ग्रामीण मतदार संघाकडे राज्याचे लक्ष असणार आहे. शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांचा हा मतदार संघ गड आहे. या गडात एकदा गुलाबराव देवकर यांनी सुरुंग लावले. आता पुन्हा गुलाबराव देवकर मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात मैदानात उतरले आहे.

गुलाबराव पाटील यांची हॅट्ट्रिक रोखण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे. दुसरीकडे गुलाबराव पाटील विकास कामांच्या जोरावर सलग तिसऱ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा आमदार होण्याच्या तयारी आहेत. मंत्री असले तरी सर्वसामान्यात वावरणाने कार्यकर्ते म्हणून गुलाबराव पाटलांची ओळख आहे. आता हा मतदार संघ कोणत्या गुलाबरावांना साथ देणार हे 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.

असा आहे जळगाव ग्रामीण मतदार संघाचा इतिहास

जळगाव ग्रामीण मतदार संघ एरंडोल विधानसभा मतदासंघातून 2009 मध्ये वेगळा करण्यात आला. त्यात धरणगाव तालुका आणि जळगाव तालुक्यातील गावांचा समावेश केला गेला. ग्रामीण मतदार संघ असलेल्या या भागावर शिवसेनेचा दबदबा राहिला आहे. या मतदार संघात 2009 मधील पराभवानंतर गुलाबराव पाटील खचले नाही. त्यांनी पुन्हा जोमाने कामे केली. जनसंपर्क कायम ठेवला. कार्यकर्त्यांच्या सुख-दु:खात सहभागी झाले. त्यामुळे पुन्हा 2014, 2019 मध्ये गुलाबराव पाटील यांना विजय मिळाला. परंतु या काळात गुलाबराव देवकर घरकुल घोटाळ्यामुळे अडचणीत आले होते. आता ते पुन्हा नवीन दमाने प्रचार करत आहेत. त्यामुळे 2024 मधील दोन गुलाबरावांची लढत चुरशीची होण्याची चिन्ह राजकीत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

हे सुद्धा वाचा

असे आहेत मतदार

2011 च्या जनगणनेनुसार जळगाव ग्रामीण मतदार संघात 24,433 एससी मतदार आहेत. 60,455 एसटी मतदार आहेत. 26,648 मुस्लिम मतदार आहेत. ग्रामीण मतदार 291,875 तर शहरी मतदार 29,184 आहेत. या मतदार संघावर मराठा मतदारांची संख्या मोठी आहे. गुलाबराव देवकर मराठा तर गुलाबराव पाटील गुर्जर आहेत. परंतु मराठा मतदारांनी नेहमी गुलाबराव पाटील यांनाच साथ दिली आहे. लोकसभा निवडणुकीतही मराठा आंदोलन चर्चेत असताना या भागातील मराठा मतदार भाजप शिवसेना सोबतच राहिला आहे. आता विधानसभेचे गणित कसे असणार? या सर्व गोष्टी प्रचाराच्या रणनीतीवरुनही ठरणार आहे.