जळगाव : जळगावातील एका योग शिक्षकाने महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने कोरोना बरा होतो, असा अजब दावा केला आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने एका कोव्हिड हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना योग आणि प्राणायामचे धडे देण्यात आले. यावेळी रुग्णांकडून महामृत्युजय मंत्राच्या जप करून घेतल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम समोर आल्याचे या योग शिक्षकाचे म्हणणे आहे. मात्र, योग शिक्षकाने केलेला हा दावा आयएमए (इंडियन मेडिकल असोसिएशन) तसेच अंधअद्धा निर्मूलन समितीने खोडून काढला आहे. असा दावा करणे चुकीचे असून, कोणत्याही व्याधीवर वैद्यकीय उपचार घेणेच योग्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे योग शिक्षकाने केलेला दावा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. (Jalgaon yoga teacher krunal mahajan alleged that by mrityunjay mantra patient will be coronavirus free will increase oxygen level)
मिळालेल्या माहितीनुसार, कृणाल महाजन असे दावा करणाऱ्या योग शिक्षकाचे नाव असून, ते जळगावातील निर्धार योग प्रबोधिनीचे सचिव आहेत. गेल्या 4 वर्षांपासून ते जळगावात निर्धार योग प्रबोधिनीच्या माध्यमातून लोकाना योग आणि प्राणायामचे प्रशिक्षण देत आहेत. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर गेल्या 9 महिन्यांपासून ते कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात जाऊन योग आणि प्राणायाम पडे देत आहेत. जळगावात कोरोनाची दुसरी लाट धडकल्यानंतर सध्या ते 2 कोव्हीड रुग्णालयातील रुग्णांना दररोज योग आणि प्राणायाम शिकवत आहेत.
महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यामुळे ऑक्सिजनची पातळी वाढल्याचा दावा
कृणाल महाजन सध्या कोव्हीड रुग्णालयातील रुग्णांना दररोज योग आणि प्राणायाम शिकवत आहेत. 2 दिवसांपूर्वी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांनी कोरोनाबाधित रुग्णांकडून महामृत्युंजय मंत्राचा जप करवून घेतला. यात असे दिसून आले की, या रुग्णालयात एक 72 वर्षीय आजोबांची प्रकृती सुधारली आहे. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी 93 टक्के इतकी होती. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असूनही ऑक्सिजन पातळी वाढत नव्हती. मात्र, आजोबांनी महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची ऑक्सिजनची पातळी 98 टक्क्यांपर्यंत वाढली. याशिवाय त्यांच्या चेहऱ्यावर तेज होते. इतर हालचालीदेखील नेहमीप्रमाणे झाल्या. महामृत्युजय मंत्राच्या जपामुळे हे शक्य झाले, असा महाजन कृणाला यांनी केलां.
योगा शिक्षक कृणाल महाजन यांनी केलेला दावा चुकीचा असल्याचे आयएमएचे म्हणणे आहे. याबाबत भूमिका मांडताना आयएमएच्या जळगाव शाखेचे सचिव डॉ. स्नेहल फेगडे माणाले की, कोरोनासारख्या कठीण काळात जसा असायंटिफिक दावा करायला नको. आम्ही जे मॉडर्न मेडिसीन आणि अॅलोपॅथिक मेडिसीनचे शिक्षण घेतले आहे त्यात अशा प्रकारे व्याधीवर उपचार होत असल्याची नोद नाही. कोणत्याही परिस्थितीत व्याधीवर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडूनच अॅलोपॅथिक मेडिसीनद्वारेच उपचार घेतले पाहिजेत, असे डॉ. फेगडे म्हणाले. योग आणि प्राणायाममुळे रुग्णांची मानसिक स्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते, असेही डॉ. स्नेहल फेगडे यांनी सांगितले,
दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक विभूजित चौधरी यांनी देखील योग शिक्षकाच्या दाव्याला हरकत घेतली आहे. चौधरी म्हणाले, “मृत्युंजय मंत्राचा जप केल्याने कोरोना किंवा अन्य कुठला आजार बरा होतो, असा दावा करणे चुकीचे आहे. कोणत्याही प्रकारचा आजार बरा होण्यासाठी आपल्याला डॉक्टराकडेच जायला हवे, असे त्यांनी सांगितले.
इतर बातम्या :
Panvel Lockdown latest news: पनवेलमध्ये रात्रीची संचारबंदी, काय सुरु? काय बंद? वाचा सविस्तर
Panvel Corona | कोरोनाचा शिरकाव होऊन एक वर्ष पूर्ण, पनवेलची सद्यस्थिती काय?
(Jalgaon yoga teacher krunal mahajan alleged that by mrityunjay mantra patient will be coronavirus free will increase oxygen level)