जळगावच्या भुसावळमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी सशस्त्र धाडसी दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी चार जिवंत काडतूस, दोन गावठी बनावटीचे पिस्तूल, पाच तलवारी, चार चाकू, एक फायटरसह मिरचीची पूड असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सात संशयित आरोपींना अटक केली आहे. आरोपी हे मध्य प्रदेश, खंडवा भुसावळ, फैजपूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेत या घटनेबाबत माहिती दिली आहे.
जळगावच्या भुसावळ-नागपूर महामार्गालगत वाटर पार्क परिसरात सशस्त्र धाडसी दरोडाच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या घटनेत पोलिसांनी मॅकझिनसह दोन गावठी बनावटीचे पिस्तूल, चार जिवंत काडतूस, पाच तलवारी तसेच चार चाकू, एक फायटर आणि मिरचीची पूड असा मुद्देमाल जप्त केला आहे. भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यात सात दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हे मध्य प्रदेश, खंडवा भुसावळ, फैजपूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. या पोलिसांच्या कामगिरीची पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
दरम्यान, पुण्यात नुकतीच सोन्याच्या दुकानात सशस्त्र दरोड्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून सोन्याच्या दुकानात दरोडा टाकला. संबंधित घटना ही घोरपडीतील बी टी कवडे रस्त्यावर असलेल्या अरिहंत ज्वेलर्समध्ये घडली. बंदुकीचा धाक दाखवून दोन व्यक्तींनी सोन्याच्या दुकानात दरोडा टाकला. संबंधित घटना ही काल रात्री सव्वा नऊ वाजता घडली. या घटनेत दुकानदार किरकोळ जखमी झाला आहे. तीन आरोपी हे दुचाकीवरुन आले होते. त्यांनी पिस्टलचा धाक दाखवत दुकानातील दुकानदाराच्या डोळ्यात स्प्रे टाकून संपूर्ण दुकान लुटलं. आरोपी भीती दाखवत, दुकानदाराच्या पाठीत उलटा कोयता मारून, सोनं लुटून फरार झाले आहेत. या प्रकरणी मुंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.